नुकतंच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. न्यूझीलंडच्या टीमने भारतातच टीम इंडियाला ३ टेस्ट सामन्यांच्या सिरीजमध्ये व्हाईटवॉश दिला आहे. यामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्याचं स्वप्न देखील भंगण्याची शक्यता आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारताने बादशाहत देखील गमावली असून आता आपण दुसर्या स्थानी आलो आहोत.
न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचा WTC फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्गही कठीण झालाय. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताला आता अजून चार सामने जिंकावे लागणार आहे. न्यूझीलंडनंतर भारताला ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. हा दौरा काहीसा कठीण असणार असून रोहित शर्मा यावेळी अनुपस्थितीत राहणार आहे.
दरम्यान, कर्णधार रोहित शर्माबाबत एक अपडेट समोर आलीये. रिपोर्टनुसार, रोहित 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
२२ नोव्हेंबरपासून भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळण्यात येणार आहे. यावेळी कर्णधार रोहित शर्मा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या टेस्ट सामन्याला मुकल्याची बातमी सोशल मीडियावर समोर पसरलीये. यावेळी तो दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याच्या अफवेला जोर मिळतोय. नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सिरीजमधील कॉमेंट्रीदरम्यान हर्षा भोगलेनेही दुसऱ्यांदा वडील होण्याचे संकेत दिले होते.
जर रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिल्या टेस्टला अनुपस्थित राहणार आहे. पीटीआयच्या अहवालात, रोहित शर्मा केवळ वैयक्तिक कारणांमुळे तो बाहेर असणार आहे, असा उल्लेख करण्यात आलाय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टेस्ट दरम्यान, कॉमेंट्रिटरने पुष्टी केली होती की, पत्नी रितिका सजदेहसह त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे तो पहिल्या टेस्टला मुकणार आहे.
हर्षा भोगले यांनी म्हटलं की, रोहित शर्मासाठीचा ऑस्ट्रेलिया दौरा हा खूप चर्चेत आहे. अशी माहिती आहे की, पहिली टेस्ट रोहित शर्मा खेळू शकणार नाही. कारण त्यांच्या घरी एक नवा पाहुणा येणार आहे.
जर या अफवा खऱ्या ठरल्या तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पॅरेंटींग लीव्हमुळे सामना मिस करणारा रोहित शर्मा दुसरा भारतीय कर्णधार ठरणार आहे. रोहित आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांचं हे दुसरं अपत्य असणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.