Rohit Sharma, Team India T20 Captaincy/File Photo SAAM TV
Sports

Rohit Sharma News : टीम इंडियात पुन्हा भूकंप होणार, आता रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार?

बीसीसीआयनं निवड समिती बरखास्त करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पुढचा नंबर रोहित शर्माचा असू शकतो.

Nandkumar Joshi

Rohit Sharma, Team India T20 Captaincy : भारतीय क्रिकेट संघात शुक्रवारी संध्याकाळीच मोठा भूकंप झाला. टी २० वर्ल्डकप स्पर्धेतून टीम इंडिया बाहेर पडल्यानंतर क्रीडाप्रेमींमध्ये संताप आहे. त्यात बीसीसीआयनं धडक कारवाई केल्यानं सगळेच अवाक् झाले आहेत. वरिष्ठ निवड समिती प्रमुखांसह संपूर्ण समितीच बरखास्त केल्यानंतर आता पुढचा नंबर रोहित शर्माचा असू शकतो, असा अंदाज बांधला जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेऊ शकतं. रोहित शर्माला टी २० क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून हटवलं जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. (Sports News)

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत वेगवेगळे कर्णधार असावेत, असे मत भारतीय क्रिकेटमधील माजी दिग्गज खेळाडूंकडून व्यक्त केले जात आहे. अशावेळी रोहित शर्माला टी २० संघाच्या कर्णधारपदावरून हटवलं जाऊ शकतं. त्याच्याकडे केवळ वनडे आणि कसोटी संघाचं नेतृत्व असण्याची शक्यता आहे. टी २० संघाचं नेतृत्व अन्य खेळाडूकडे दिले जाईल. अशावेळी हार्दिक पंड्याकडे टी २० संघाचं कर्णधारपद दिलं जाण्याची शक्यता आहे. (Cricket News)

हार्दिक पंड्या सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी २० मालिकेत संघाचं नेतृत्व करत आहे. याशिवाय हार्दिकच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सनं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर तोच संघाचा भावी कर्णधार असेल, अशा चर्चा होऊ लागल्या होत्या.

हार्दिक पंड्या पुढचा कर्णधार

बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, बदल करण्याची वेळ आली आहे, असा सर्वसाधारण मतप्रवाह आहे. टी २० वर्ल्डकप २०२४ ची तयारी करण्याची आवश्यकता आहे. हार्दिक आता या भूमिकेसाठी सध्यातरी योग्य आहे. निवड समिती सदस्य याबाबत हार्दिक पंड्याशी चर्चा करतील. त्यानंतर ते अधिकृत घोषणा करू शकतात.

म्हणून बदल होऊ शकतो....

पुढील वर्ल्डकप स्पर्धा २०२४ मध्ये होणार आहे. त्यासाठीच्या तयारीच्या बाबतीत म्हणाल तर, रोहित शर्मा क्वचितच तोपर्यंत खेळू शकेल. रोहित शर्मा सध्या ३६ वर्षांचा आहे. २०२४ मध्ये तो ३८ वर्षांचा होईल. त्याच्या फिटनेसवर सर्वकाही अवलंबून असेल. तोपर्यंत अशा खेळाडूकडे नेतृत्व दिलं जावं, जो आपल्या परीने संघ तयार करू शकेल, असे बीसीसीआयला वाटते. यात विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूचीही भूमिका महत्वाची आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT