rohit sharma twitter
क्रीडा

Rohit Sharma New Look: हिटमॅनच्या लूकची जगभर चर्चा! रोहितच्या पोस्टवर सूर्यकुमार यादवची लक्षवेधी कमेंट- VIDEO

Suryakumar Yadav Reaction On Rohit Sharma: भारताचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर सूर्यकुमार यादवने हटके कमेंट केली आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma New Look: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची फॅन फॉलोइंग जगभर पसरली आहे. मैदानात असो की मैदानाबाहेर, रोहित शर्माची एक झलक पाहण्यासाठी फॅन्स लाखोंच्या संख्येने गर्दी करत असतात.

क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी करताना आपल्या पुल शॉटमुळे चर्चेत असणारा हिटमॅन मैदानाबाहेर आपल्या लूकमुळे चर्चेत असतो. बुधवारी (२१ ऑगस्ट) मुंबईत क्रिकेट रेटिंग अवॉर्डचा सोहळा पार पडला. या सोहळ्याला रोहित शर्मानेही हजेरी लावली होती.

क्रिकेट रेटिंग अवॉर्ड शो मध्ये रोहित शर्माचा क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तर भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या अवॉर्ड शोमध्ये रोहित शर्माच्या लूकची जोरदार चर्चा झाली.

रोहितने त्याच्या या हटके लूकचा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या पोस्टवर सूर्यकुमार यादवनेही कमेंट केली आहे. ज्यात त्याने ' मुंबईचा राजा..' असं लिहिलं आहे.

तर आणखी एका युजरने, ' भाऊ पूर्ण बॉलिवूडला नाश्त्यात खातो...' असं लिहिलंय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने इतिहास रचला आहे. अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत आयसीसी टी -२० वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. यासह तब्बल ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवत भारतीय संघाने आयसीसीची ट्रॉफी जिंकली होती.

मात्र ही स्पर्धा झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना अतिशय वाईट बातमी मिळाली. कर्णधार रोहित शर्मा,विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान रोहितची कर्णधारपदाची जागा रिकामी झाल्यानंतर ही जागा मुंबईकर सूर्यकुमार यादवला देण्यात आली आहे. बीसीसीआयने सूर्यकुमार यादवची पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT