Rohit sharma
Rohit sharma  Twitter
क्रीडा | IPL

Ind vs Aus: अखेर रोहितने मौन सोडले! सूर्यकुमार यादवची वनडे संघातून होणार सुट्टी?

Ankush Dhavre

Rohit sharma on suryakumar yadav: रविवारी भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पार पडला.

या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यात भारतीय संघाचा १० गडी राखून दारुण पराभव झाला आहे.

दरम्यान या सामन्यातही फ्लॉप ठरलेल्या सूर्यकुमार यादव बद्दल कर्णधार रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे.

दुसरा वनडे सामना झाल्यांनतर रोहित शर्माने म्हटले की, 'श्रेयस अय्यर केव्हा परतणार याबाबत आम्हाला काहीच कल्पना नाहीये. त्यामुळे ती जागा खाली आहे. त्यामुळे आम्ही त्याला संधी देणार. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगीरी केली आहे. मी अनेकदा म्हटलं आहे की, त्याच्यात क्षमता आहे त्याला संधी मिळणार.' (Latest sports updates)

तसेच तो पुढे म्हणाला की, 'गेल्या २-३ सामन्यांमध्ये तो स्वस्तात माघारी परतला आहे. मात्र त्याला सलग ८-१० सामने खेळायची संधी मिळायला हवी. आता खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याला संधी मिळत आहे. संघ व्यवस्थापकांचं काम खेळाडूंना संधी देणं आहे. जेव्हा काही वाटेल तेव्हा आम्ही नक्की विचार करू. आता आम्ही सध्या याबाबत कुठलाही विचार करत नाहीये.'

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा डाव ११७ धावांवर संपुष्ठात आला आहे. भारतीय संघासाठी विराट कोहलीने ३१ धावांची खेळी केली.

या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने १० गडी राखून विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस उज्ज्वल निकम यांच्याबद्दल काय म्हणाले ?

Today's Marathi News Live : राहुल गांधींच्या सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनाच नो एन्ट्री

Amit Shah : अमित शाह यांच्या Deepfake व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; ट्विटर हॅण्डल चालवणाऱ्या एकाला अटक

Contractors Engineer: राज्यातील अभियंता कंत्राटदार ७ मे पासून करणार काम बंद

Sanjay Nirupam Joins Shinde Group | संजय निरूपम यांचा शिंदे गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT