Rohit Sharma 12000 Runs : 
Sports

रोहित शर्माचा तोडफोड षटकार! '12 हजारी मनसबदार' हिटमॅनचा खतरनाक अंदाज, VIDEO व्हायरल

Rohit Sharma 12000 Runs : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत रोहित शर्माने १२ हजार वनडे धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला. याच सामन्यात त्याच्या तुफानी षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Namdeo Kumbhar

Rohit Sharma 12000 ODI runs against West Indies : वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात ४०६ धावांच्या अवाढव्य आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत अवघ्या १८ षटकांत १७२ धावांचा पाऊस पाडला. रोहित शर्माच्या या स्फोटक फलंदाजीने स्टेडियममधील चाहत्यांना मंत्रमुग्ध केले, मात्र त्याच्या एका तुफानी षटकाराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

१७ व्या षटकात घडला 'तो' प्रकार

वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज पॉल १७ वे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या पहिल्याच फुलटॉस चेंडूवर रोहित शर्माने गोलंदाजाच्या डोक्यावरून एक भीषण षटकार ठोकला. चेंडूचा वेग आणि फटक्यातील ताकद इतकी जबरदस्त होती की, सीमारेषेपलीकडे स्टेडियमच्या सुरक्षेसाठी लावलेला काळा रंगाचा पडदा चेंडूने गोळीसारखा आरपार फाडला.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

स्टेडियमच्या बाहेरील पडदा फाडून चेंडू पार गेल्याचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'हिटमॅन' रोहित शर्माच्या या 'खतरनाक' आणि तोडफोड अंदाजाचे चाहते मोठे कौतुक करत आहेत.

रोहित शर्मा 12 हजारी मनसबदार

हिटमॅन रोहित शर्माने एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये आणखी एक नवा इतिहास रचला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२,००० धावांचा टप्पा पार करणारा रोहित शर्मा हा जगातील दुसरा सर्वात जलद फलंदाज ठरला आहे. त्याने दिग्गज फलंदाजांना मागे टाकत ही ऐतिहासिक टप्पा गाठला. रोहितच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणाऱ्या निवडक आणि दिग्गज फलंदाजांच्या क्लबमध्ये आता त्याचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले गेले आहे. सर्वात वेगवान १२ हजार धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे.

वेस्ट इंडिजचा ४०५ धावांचा डोंगर

गुवाहाटी येथे खेळवल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ५० षटकांत ७ गडी गमावून ४०५ धावांचा विशाल डोंगर उभारला. वेस्ट इंडिजच्या वनडे इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. जॉन कॅम्पबेल: १०१ धावा (६८ चेंडू, ९ चौकार, ५ षटकार), अमिर जांगू: ११४ धावा (७७ चेंडू, १३ चौकार, ३ षटकार), शई होप (कर्णधार): १०४ धावा (९४ चेंडू, ८ चौकार, ३ षटकार) या ३ खेळाडूंनी शतके ठोकली.

४०६ धावांच्या ऐतिहासिक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी तुफानी सुरुवात केली आहे. रोहित शर्मा: ८३* धावा (६२चेंडू) आणि शुभमन गिल: १००* धावा (६३ चेंडू) खेळत आहे. भारताने बिनबाद १९३ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latest Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स, जे तुम्हालाही नक्की आवडतील

Maharashtra News Live Update: शरद पवार करणार दुष्काळ दौरा, पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

Maharashtra weather : बळीराजाची चिंता वाढली! राज्यातून मान्सूनची 'एक्झिट; मराठवाडा अन् विदर्भात पावसाची भयंकर तूट

Pradeep Purnekar : ठाण्यात शिंदे शासन आहे का? पूर्णेकर प्रकरणानंतर संजय राऊत यांचा पोलीस ठाण्यातून संतप्त सवाल

1 Gram Gold Earrings : 1 ग्रॅम गोल्डमध्ये बनवा सोन्याचे कानातले, महिलांसाठी सुंदर ७ डिझाईन्स

SCROLL FOR NEXT