Rohit Sharma saam tv
Sports

Rohit Sharma: मैदानात पाऊल ठेवताच रोहित शर्माचा नवा रेकॉर्ड; राहुल द्रविडलाही टाकले मागे

Rohit Sharma 510th international match record: अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीतील 510 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत राहुल द्रविडला मागे टाकलं. यासह तो भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात मैदानात उतरताच एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. लखनऊमध्ये सुरु असलेल्या या सामन्यात खेळण्यासाठी तो मैदानात उतरल्याक्षणी भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत राहुल द्रविडला मागे टाकलंय.

अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात रोहितकडून मोठी खेळी पाहायला मिळाली नव्हती. कर्णधार शुभमन गिससोबत चुकामुक झाल्याने तो रनआऊट झाला होता. आजच्या सामन्यात रोहित शर्माने ४८ रन्सची खेळी केली. मात्र राशिद खानच्या गोलंदाजीवर तो बोल्ड झाला. गेल्या काही काळात रोहित फिटनेसशी संबंधित अडचणींमुळे चर्चेत होता. मात्र आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याने आज चांगल्या लयीत फलंदाजी केली.

राहुल द्रविडचा विक्रम टाकला मागे

अफगाणिस्तानच्या दुसऱ्या वनडे सामन्यात उतरताच रोहित शर्माने एकूण ५१० सामने खेळण्याचा रेकॉर्ड केलाय. यावेळी त्याने टीम इंडियाचा माजी कोच राहुल द्रविडला मागे टाकलंय. राहुल द्रविडनेही भारतासाठी 509 आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत रोहित मैदानात उतरताच तो त्याच्या कारकिर्दीतील 510वा आंतरराष्ट्रीय सामना ठरलाय.

यामुळे भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित चौथ्या स्थानावर पोहोचला असून राहुल द्रविड पाचव्या क्रमांकावर आहे.

सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी

या यादीत अव्वल स्थानावर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने भारतासाठी तब्बल 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याच्या नावावर 559 सामने आहेत. तिसऱ्या स्थानावर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आहे. धोनीने भारतासाठी 538 आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. तर आता चौथ्या स्थानावर रोहित शर्मा आहे.

भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे खेळाडू

  • सचिन तेंडुलकर – 664 सामने

  • विराट कोहली – 559 सामने

  • महेंद्रसिंह धोनी – 538 सामने

  • राहुल द्रविड – 509 सामने

  • रोहित शर्मा – 509 सामने

  • मोहम्मद अझहरुद्दीन – 433 सामने

  • सौरव गांगुली – 424 सामने

  • युवराज सिंह – 402 सामने

  • अनिल कुंबळे – 401 सामने

  • रविंद्र जाडेजा – 373 सामने

  • हरभजन सिंह – 365 सामने

पाकिस्तानविरुद्ध खेळली होती तुफान खेळी

16 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या वनडे वर्ल्ड कप सामन्यात रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली होती. त्याने या सामन्यात 140 रन्सची तुफानी खेळी साकारत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान साहित्याचे वाटप

काचेच्या बांगड्याची फॅशन जुनी झाली, यंदा वटपौर्णिमेला खरेदी करा 'या' ५ नवीन डिझाईन्सच्या हिरव्या बांगड्या

शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिंदेंना बेदम मारहाण, बायकोचे हातपाय तोडून विहिरीत फेकण्याची धमकी, आरोपीत प्रसिद्ध रील स्टारचा समावेश

Political News: मोठी बातमी! TMC, शिवसेनेनंतर देशातील आणखी एक मोठा पक्ष फुटणार, कॅबिनेट मंत्र्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ

खासदार ओमराजे निंबाळकर कोणत्या कारणामुळे फुटीर झाले? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT