Jasprit Bumrah saam tv
Sports

Jasprit Bumrah: रोहित शर्मा झाला कॅप्टन; बुमराहने घेतला मोठा निर्णय, थेट मुंबई इंडियन्सला कळवला नकार

Mumbai Indians Captain: आयपीएल २०२७ मध्ये रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, जसप्रीत बुमराहने उपकर्णधारपदाची ऑफर नाकारली. मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांचा विचार का केला नाही?

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल २०२७ मध्ये मुंबई इंडियन्सच्या (MI) टीमची धुरा पुन्हा एकदा रोहित शर्माच्या हातात असणार आहे. रोहित शर्मा पुन्हा टीमचा कर्णधार होणार असल्याची माहिती समोर आलीये. गेल्या तीन सिझनमध्ये मुंबई इंडियन्सला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यातच हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना टीमतील खेळाडूंमध्ये एकमेकांवरील विश्वास कमी झाल्याची चर्चा रंगली होती.

दरम्यान यामुळेच रोहितला पुन्हा कर्णधारपद देण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. पण रोहितच्या कमबॅसोबतच जसप्रीत बुमराहबाबतही एक महत्त्वाची माहिती समोर आलीये. बुमराहने रोहित कर्णधार असताना उपकर्णधार होण्यास नकार दिला होता.

मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार, बुमराह आणि तिलकचा विचार केला नाही?

मुंबई इंडियन्सकडे कर्णधारपदासाठी सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा असे तीन पर्याय होते. पण टीमने या तिघांपैकी कोणाचीही निवड केली नाही. सूर्यकुमार यादवने याच वर्षी भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवून दिलंय. तरीही मुंबई इंडियन्सने त्याला कर्णधारपदाच्या शर्यतीत स्थान दिलं नाही.

यामागचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाहीये. याशिवाय दुसरीकडे, भारतीय टी-२० टीमचा उपकर्णधार असलेल्या तिलक वर्माला भविष्यातील खेळाडू म्हणून तयार केलं जात असल्याचं मानलं जात आहे.

बुमराहला कर्णधारपद नाही, तर उपकर्णधारपदाची ऑफर

सध्या मुंबई इंडियन्सकडे ठरलेला उपकर्णधार नाही. अशा वेळी कर्णधार टीमसोबत नसल्यास एखाद्या अनुभवी खेळाडूला नेतृत्वाची जबाबदारी सांभाळावी लागते. गेल्या सिझनमध्ये हार्दिक पंड्या टीममध्ये नसताना सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी आलटून-पालटून टीमचे नेतृत्व केलं होतं.

बुमराहला मुंबई इंडियन्सने १८ कोटी रुपयांत केलेलं रिटेन

जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. २०२५ च्या मेगा ऑक्शनपूर्वी मुंबईने त्याला १८ कोटी रुपये देऊन टीममध्ये कायम ठेवलं होतं. तर हार्दिक पंड्या, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबई इंडियन्ससोबत राहण्यासाठी त्यांच्या पगारात कपात स्वीकारली होती.

MI च्या कर्णधारपदाबाबत बुमराह काय म्हणाला होता?

मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत याआधीही बुमराहचे नाव चर्चेत आलं होतं. २०२६ च्या सिझनमध्ये त्याच्याकडे काही काळासाठी टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी बुमराहने मजेशीर प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता, 'मुंबई इंडियन्सचा कर्णधार होण्याआधी मी टेस्ट टीमचा कर्णधार होईन, असा विचारही केला नव्हता.'

बुमराहने २०१३ मध्ये वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी त्याच्या गोलंदाजीच्या वेगळ्या शैलीची बरीच चर्चा झाली होती. आतापर्यंत त्याने आयपीएलचे १४ सिझन खेळले असून त्याच्या नावावर १८७ विकेट्स आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये त्याचं महत्त्वाचं स्थान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुण्यात अतिक्रमणांवर सलग दहाव्या दिवशी बुलडोझर; २.२० लाख चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटवली

BJP Leader : भाजपच्या बड्या नेत्याला मुंबई पोलिसांनी उचललं; 'त्या' प्रकरणात मोठी कारवाई, राजकारणात खळबळ

Accident Death : भयंकर अपघात! ऊसाच्या ट्रॅक्टरची बसला धडक, ६ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Pregnancy Planning Tips: बाळासाठी प्रयत्न करताय, पण वारंवार अपयश येतंय? मग शरीरातील या एका गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका!

रोज आवळ्याचा ज्यूस कोणी पिऊ नये? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT