Rohit Sharma Retirement saam tv
Sports

Rohit Sharma: रोहित शर्माचा निर्णय ठरला? आई-वडील पोहोचले लंडनमध्ये, लॉर्ड्सवरील वनडे ठरणार का हिटमॅनचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना?

Rohit Sharma Retirement: रोहित शर्माच्या वनडे भविष्याबाबत मोठी चर्चा रंगली आहे. लॉर्ड्सवरील तिसरा सामना त्याचा अखेरचा ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे. 2027 वर्ल्डकप लक्षात घेऊन निवड समिती युवा खेळाडूंना संधी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भारतीय क्रिकेट टीममध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आता अधिकच वाढली आहे. इंग्लंड दौऱ्यात सुरू असलेल्या वनडे सिरीजदरम्यान रोहित शर्माच्या भवितव्याबाबत मोठी चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी लॉर्ड्सवर होणारा तिसरा वनडे सामना हा रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय निवड समिती आता पुढील काही वर्षांचा विचार करून टीम तयार करतेय. 2027 च्या वनडे वर्ल्डकप लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून युवा खेळाडूंना अधिक संधी देण्याची रणनीती आखली जातेय.

रोहितचे आई-वडिल पोहोचले लंडनला

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे आई-वडील, गुरुनाथ शर्मा आणि पूर्णिमा शर्मा, भारत-इंग्लंड यांच्यात १९ जुलै रोजी लॉर्ड्सवर होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यापूर्वी लंडनमध्ये दाखल झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, हा सामना रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

रोहितबाबत निवड समितीची भूमिका बदलली?

PTI च्या वृत्तानुसार, मुख्य सिलेक्टर्स अजित आगरकर सध्या इंग्लंड दौऱ्यावर भारतीय टीमसोबत आहेत. इंग्लंडविरुद्धची सिरीज संपल्यानंतर रोहित शर्माची वनडे टीममध्ये निवड करण्याच्या बाजूने ते नसल्याची चर्चा आहे. निवड समितीचं मत असे आहे की, आता नव्या पिढीतील खेळाडूंना तयार करण्याची वेळ आली असून भविष्यासाठी टीम तयार सुरू करणं गरजेचं आहे.

अलीकडच्या कामगिरीने वाढवली चिंता

रोहित शर्माची अलीकडची वनडेतील कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. मागील आठ वनडे सामन्यांमध्ये त्याने 30.1 च्या सरासरीने आणि 88.6 च्या स्ट्राइक रेटने 241 रन्स केलेत. या आठ सामन्यांमध्ये त्याच्या नावावर केवळ एकच अर्धशतक आहे.

यशस्वी जयस्वालला सलग संधी देण्याची योजना

बीसीसीआयशी संबंधित एका वरिष्ठ सूत्राने PTIला सांगितलं की, युवा ओपनर यशस्वी जायसवालला सातत्याने वनडेमध्ये खेळवण्याचा विचार सुरू आहे. इंग्लंड दौऱ्यात त्याने तीन डावांत दोन शतकं झळकावली असून त्याला पुढील सुमारे 20 वनडे सामने संधी देण्याचा विचार आहे. त्यामुळे 2027 च्या वर्ल्डकपसाठी त्याची योग्य तयारी होऊ शकेल, असा निवड समितीचा विचार आहे.

याच सूत्राने असंही सांगितलंय की, रोहित शर्मा टीममध्ये राहिला तर जायसवालला संधी मिळणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे भविष्यातील टीम लक्षात घेऊन निवड समिती बदल करण्याच्या तयारीत आहे.

अंतिम निर्णय मात्र रोहितचाच

या अहवालात आणखी एक महत्त्वाची बाब सांगण्यात आली आहे. निवड समिती कोणत्याही खेळाडूला निवृत्ती घेण्यास भाग पाडू शकत नाही. त्यामुळे रोहित शर्माच्या भवितव्याचा अंतिम निर्णय त्यालाच घ्यावा लागणार आहे. मात्र सप्टेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या घरच्या वनडे सिरीजपूर्वी निवड समिती नव्या दिशेने पावलं उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

विराट कोहलीबाबत वेगळी भूमिका

रोहितबाबत बदलाचा विचार सुरू असला तरी विराट कोहलीच्या बाबतीत चित्र वेगळं असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य सिलेक्टर अजित आगरकर यांचं मत असं आहे की, विराटची सध्याची कामगिरी आणि फिटनेस पाहता तो अजूनही भारतीय वनडे टीममध्ये पहिली पसंती आहे. त्यामुळे त्याच्या स्थानाबाबत सध्या कोणताही प्रश्न उपस्थित होत नसल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य रेल्वेवर फास्ट ट्रेनचे थांबे बदलणार, हार्बरवर काही लोकल रद्द

Bollywood Actor Hospitalized: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्याची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया

Maharashtra News Live Update: जळगावात दहावीच्या विद्यार्थ्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला

Nashik: देवळा-मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू, कारचालक फरार

Relationship: लग्नानंतर तुमच्यावरील प्रेम कमी झालं? नेहमी बोला फक्त 'ही' गोष्ट; नवरा दररोज घेईल मिठीत

SCROLL FOR NEXT