Rohit Sharma at Sydney Airport after the ODI series against Australia — his emotional “Signing Off” post sparks retirement rumours. Saam Tv
Sports

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार? चाहत्यांमध्ये खळबळ

Rohit Sharma Emotional Post: रोहित शर्माच्या एका पोस्टमुळे क्रिकेटप्रेमींपुढे मोठा प्रश्न निर्माण झालाय.. रोहित शर्मा खरचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेणार का? रोहित शर्मानं समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

Omkar Sonawane

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार का? ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही वनडे मालिका त्याची शेवटची असणार का? कसोटी आणि टी20 क्रिकेटनंतर आता रोहित एकदिवसीय क्रिकेटला अलविदा करणार का? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलेत... आणि याचं कारण ठरलंय रोहितने सोशल मीडियावर केलेली एक भावनिक पोस्ट...

ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर हिटमॅन रोहित शर्माच्या एका भावनिक सोशल मीडिया पोस्टने क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली आहे. त्याने सिडनी एअरपोर्टवरील आपला फोटो शेअर करत, "शेवटच्या वेळी, सिडनीहून सायनिंग ऑफ" असं कॅप्शन दिलंय... या पोस्टमुळे रोहित वनडे क्रिकेटमधूनही निवृत्त होणार संकेत मानले जातायत...

खरतर गेल्या काही महिन्यांपासून रोहित शर्माच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल अनेक अंदाज लावले जात आहेत... शिवाय त्याच्या वाढलेलं वजन आणि सुटलेल्या पोटावरुनही टीका केली होती... पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहितने आपलं वजन कमी करत टीकाकारांची तोंडं तर बंद केलीच, शिवायय ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एक शतक आणि एक अर्धशतक ठोकत टायगर अभी जिंदा है हे देखील दाखवून दिलंय..पण आता ऑस्ट्रेलियातून परतताना केलेली ही भावनिक पोस्ट, ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचा हा अखेरचा दौरा होता का अशा चर्चांनी आता जोर धरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

SCROLL FOR NEXT