कोहलीचे दिवस भरले; वनडेचे कर्णधारपद 'हिटमॅन' रोहितकडे! साम टीव्ही
Sports

कोहलीचे दिवस भरले; वनडेचे कर्णधारपद 'हिटमॅन' रोहितकडे!

भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी संघ जाहीर करण्यात आला असून बीसीसीआयने रोहित शर्मा हा टी २० आणि वनडेसाठी कर्णधार असेल असे स्पष्ट केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिल्ली : भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाची घोषणा करताना बीसीसीआयने रोहित शर्मा (Rohit Sharma) हा टी २० आणि वनडेसाठी कर्णधार असेल असंही स्पष्ट केलं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघ (Team India) कसोटी मालिकेसह वनडे (ODI) सामन्यांची मालिका खेळणार आहे.

गेल्या काही वर्षांत इंग्लंड ऑस्ट्रेलिया सारख्या क्रिकेट (Cricket) संघांनी मर्यादीत षटकांसाठी आणि कसोटी संघासाठी वेगवेगळ्या नेतृत्व निवडीला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीच्या काळात या स्प्लिट कॅप्टन्सीला भारतात विरोध झाला. पण टी-20 वर्ल्ड कपनंतर भारतीय संघही या मार्गावर जाण्यास तयार झाल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर आता वनडेत रोहित राज्य आल्याचे पाहायला मिळत आहे.

कसोटी संघ - विराट कोहली (virat kohli) (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), के एल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politcs : कुछ बडा होने वाला है! दिल्लीत महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला, पडद्यामागं काय घडतंय? VIDEO

Unnao Hit-and-Run: आमदाराच्या कारनं दुचाकीस्वाराला उडवलं; रेल्वे पुलावरून खाली कोसळून भाजप नेत्याच्या भावाचा मृत्यू

Shocking : धक्कादायक! एम्समधील नर्सच्या दोन चिमुकल्यांना घरात जिवंत जाळलं; आईनं हंबरडा फोडला

Maharashtra Live News Update: एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक, सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त

Shocking : २८ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT