rohit sharma rahul dravid ajit agarkar given condition to hardik pandya to get place in team india  yandex
Sports

Hardik Pandya: हार्दिक पंड्याचं टीम इंडियातील स्थान धोक्यात; रोहित शर्मा, राहुल द्रविडनं घातल्या अटीशर्ती?

Hardik Pandya In Team India: हार्दिक पंड्याच्या खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान कर्णधार रोहित शर्मा, हेड कोच राहुल द्रविड आणि टीम मॅनेजमेंटने हार्दिक पंड्यासमोर एक अट ठेवली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेचा थरार येत्या १ जूनपासून वेस्टइंडीज आणि अमेरिकेत रंगणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतात आयपीएल २०२४ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते. तर हार्दिक पंड्याच्या खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान कर्णधार रोहित शर्मा, हेड कोच राहुल द्रविड आणि टीम मॅनेजमेंटने हार्दिक पंड्यासमोर एक अट ठेवली आहे.

हार्दिक पंड्याला भारतीय संघात स्थान मिळणार का?

हार्दिक पंड्या हा भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. मात्र सध्या तो भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसतोय. त्याला आयपीएल वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र स्पर्धेच्या मध्येच तो दुखापतग्रस्त झाला होता. काही महिने संघाबाहेर राहिल्यानंतर आयपीएल २०२४ स्पर्धेतून त्याने कमबॅक केलं. मात्र या स्पर्धेतही त्याला आपली छाप सोडता आलेली नाही. गोलंदाजी करताना तो पूर्णपणे फ्लॉप ठरतोय. तसेच फलंदाजीतही त्याला योगदान देता आलेलं नाही.

रोहित शर्मा - राहुल द्रविडने घातल्या अटीशर्ती?

आगामी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्मा हा भारतीय टी -२० संघाचं नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो. तर हार्दिक पंड्याला स्थान मिळणार की नाही हे त्याच्या गोलंदाजीवर अवलंबून असणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, हेड कोच राहुल द्रविड आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी ठरवलं आहे की, जर हार्दिक पंड्याला टी -२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळवायचं असेल तर त्याने आयपीएल स्पर्धेत सातत्याने गोलंदाजी करणं गरजेचं आहे.'

आयपीएल २०२४ स्पर्धेत फ्लॉप शो..

हार्दिक पंड्या या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करतोय. या हंगामातील ६ सामन्यांमध्ये तो सातत्याने गोलंदाजी करतोय. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. ६ सामन्यात त्याने ११ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याला केवळ ३ गडी बाद करता आले आहेत. तर फलंदाजीत त्याला केवळ १३१ धावा करता आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain improvement exercises: फोकस आणि स्मरणशक्ती वाढवायचीये? डॉक्टरांनी सांगितले मेंदूचे 3 सोपे व्यायाम, आजपासूनच करून पाहा

Kitchen Hacks : भाजीत मीठ जास्त झालंय? करा 'हा' रामबाण उपाय, चवीला लागेल बेस्ट

Beed News: बैल नसल्याने जु खांद्यावर घेऊन शेतकऱ्याने केली कोळपणी, लातूरनंतर बीडमधील शेतकऱ्याचा VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

Mithila Palkar: मिथिलाचं गोड हास्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

SCROLL FOR NEXT