rohit sharma saam tv
क्रीडा

IND vs WI 2nd Test: हिटमॅन इज बॅक! दुसऱ्या कसोटीत रोहितने रचला इतिहास; असा कारनामा करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

Rohit Sharma Record: भारतीय संघाकडून रोहित शर्माने ८० धावांची बहुमूल्य खेळी केली. यासह त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

IND vs WI Rohit Sharma New Record: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना त्रिनिदादच्या मैदानावर सुरू आहे. नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने पहिल्या दिवशी ४ गडी बाद २८८ धावा केल्या आहेत.

तर पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर विराट कोहली नाबाद ८७ नाबाद परतला आहे. तर रविंद्र जडेजाने नाबाद ३६ धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडून रोहित शर्माने ८० धावांची बहुमूल्य खेळी केली. यासह त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. (Rohit Sharma Record)

असा कारनामा करणारा पहिलाच भारतीय फलंदाज..

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. रोहित शर्माने भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज म्हणून २ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत देखील २ हजार धावांचा पल्ला गाठला आहे. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत २ हजार धावा पूर्ण करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.

या सामन्यात वेस्टइंडीज संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणाचा स्वीकार करत भारतीय संघाने ८४ षटक अखेर २८८ धावा केल्या आहेत.

भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांची जोडी मैदानात आली होती. यशस्वी जयस्वालने चांगली सुरुवात करून देत, ७४ चेंडूंचा सामना करत ५७ धावांची खेळी केली.

यादरम्यान त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारले. तर रोहित शर्माने १४३ चेंडूंचा सामना करत ८० धावा चोपल्या. तर तिसऱ्या क्रमांकावर आलेला शुबमन गिल या डावातही हवी तशी कामगिरी करू शकला नाही. तो १० धावा करत माघारी परतला. तर अजिंक्य रहाणेने केवळ ८ धावा केल्या. (Latest sports updates)

त्यानंतर विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने मिळून भारतीय संघाचा डाव सावरला. दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली आहे. विराट कोहली ८७ धावांवर नाबाद आहे. तर रविंद्र जडेजा ३६ धावांवर फलंदाजी करतोय. दोघांनी मिळून १०६ धावा जोडल्या आहेत. डावाची सुरुवात करताना रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने देखील शतकी भागीदारी केली होती.

तर वेस्टइंडीज संघाकडून १३ षटकांत ३० धावा खर्च करत १ गडी बाद केला. तर वारिकनने २५ षटकांत ५५ धावा खर्च करत १ गडी बाद केला. तर गॅब्रियलने १ आणि केमार रोचने देखील प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT