IND vs WI: भारत - वेस्टइंडीज मालिकेसह 'या' स्टार खेळाडूची कारकीर्द संपणार! लवकरच घेणार निवृत्तीचा निर्णय

Team India News: या मालिकेसह भारतीय संघातील एका कौशल्यवान गोलंदाजाची कारकीर्द देखील संपणार आहे.
team india
team india saam tv
Published On

Team India: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला होता.

तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना त्रिनिदादच्या मैदानावर रंगणार आहे. ही मालिका संपल्यानंतर भारतीय संघ ३ वनडे आणि ५ टी -२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. दरम्यान या मालिकेसह भारतीय संघातील एका कौशल्यवान गोलंदाजाची कारकीर्द देखील संपणार आहे.

team india
Team India Playing 11: पहिल्या कसोटी सामन्यासाठी कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11? स्वतः रोहितने केला खुलासा

हा गोलंदाज लवकरच घेणार निवृत्ती..

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज संदीप शर्मा लवकरच निवृत्ती जाहीर करू शकतो. २९ वर्षीय संदीप शर्माला भारतीय संघासाठी केवळ २ टी -२० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. २०१५ मध्ये त्याला झिम्बाब्वे दौऱ्यावर टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.

या मालिकेतील २ टी -२० सामने खेळल्यानंतर त्याला भारतीय संघात कमबॅक करण्याची संधी मिळालीच नाही. या २ सामन्यांमध्ये त्याला १ विकेट घेता आला आहे. त्याची ही कामगिरी पाहता त्याचं कमबॅक होणं कठीण आहे.

राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व..

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची विकेट मिळवणं हे अनेकांचं स्वप्न आहे. मात्र संदीप शर्माने ७ वेळेस त्याची विकेट मिळवली आहे. त्याच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ११६ सामन्यांमध्ये १२४ विकेट्स घेतल्या आहेत. २० धावा खर्च करत ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएल २०२३ स्पर्धेत तो राजस्थान रॉयल्स संघासाठी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. (Latest sports updates)

team india
FIFA Women's World Cup 2023: न्यूझीलंडमध्ये ओपनिंग मॅचपूर्वीच नॉर्वे संघाच्या हॉटेलवर फायरींग! दोघांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

आयपीएल २०२३ स्पर्धेत अप्रतिम गोलंदाजी..

आयपीएल २०२३ स्पर्धेत देखील त्याने जोरदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेत तो पंजाब किंग्ज संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. या हंगामातील ५ सामन्यांमध्ये त्याला २ विकेट्स घेता आल्या होत्या.

त्याची ही कामगिरी पाहता त्याला रिलीझ करण्यात आले होते. मात्र राजस्थान रॉयल्स संघाने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला संघात स्थान दिले. त्याने या स्पर्धेतील १२ सामन्यांमध्ये १० विकेट्स घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com