Rohit sharma google
Sports

Rohit Sharma: हा काय प्रश्न आहे? पत्रकाराच्या प्रश्नावर संतापला रोहित शर्मा; पाहा हिटमॅनने दिलेलं सडेतोड उत्तर!

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ही शेवटची वनडे सिरीज असून बुधवारी रोहित शर्माने प्रत्रकार परिषद घेतली. यावेळी हिटमॅनला काही प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान यावेळी रोहित शर्मा एका प्रश्नावर संतापलेला दिसला.

Surabhi Jayashree Jagdish

आजपासून इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे सिरीजला सुरुवात होणार आहे. ४-१ च्या फरकाने टी-२० सिरीज जिंकल्यानंतर आता सर्वांचं लक्ष वनडे सिरीजकडे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ही शेवटची वनडे सिरीज असून बुधवारी रोहित शर्माने प्रत्रकार परिषद घेतली. यावेळी हिटमॅनला काही प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान यावेळी रोहित शर्मा एका प्रश्नावर संतापलेला दिसला.

नागपूरमध्ये रंगणार पहिली वनडे

भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे सिरीजमधील पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने रोहित शर्माला विचारलं की, टेस्ट क्रिकेटमधील खराब कामगिरीनंतर तो वनडे क्रिकेटमधील आव्हानासाठी तयार आहे का? दरम्यान या प्रश्नावर रोहित काहीसा संतापला होता. मात्र तरीही त्याने फार संयमाने उत्तर दिलं.

काय म्हणाला रोहित?

पत्रकाराने रोहितला विचारलं की, टेस्टमध्ये चांगली खेळी न करताही तू आता अशा फॉरमॅटमध्ये फलंदाजी करणार आहेस जिथे तुला 'हिटमॅन' म्हणून ओळखलं जातं?

यावर रोहित शर्माने उत्तर दिलं की, हा कसला प्रश्न आहे? हा एक वेगळा फॉरमॅट आहे. एक क्रिकेटपटू म्हणून आपण चढ-उतारांमधून जात असतो. मी त्यातून बरंच काही अनुभवलंय. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक दिवस हा एक नवीन दिवस असतो. प्रत्येक सिरीज ही एक नवीन असते.

रोहित पुढे म्हणाला की, मी आव्हानाची वाट पाहतोय. मी भूतकाळात काय घडलं यावर लक्ष केंद्रित करत नाही. अर्थात तुम्हीही असं करत नाही. भूतकाळात जास्त लक्ष केंद्रित करण्याचं मला कोणतंही कारण वाटत नाही. काय घडणार आहे आणि माझ्यासाठी पुढे काय आहे यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.

टेस्टमध्ये रोहितची खराब कामगिरी

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्माच्या भविष्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांबाबत त्याला प्रश्न विचारण्यात आला. यावर रोहित म्हणाला, "माझ्या भविष्याबद्दल अनेक वर्षांपासून बातम्या येतायत. मी त्या बातम्यांवर स्पष्टीकरण देण्यासाठी याठिकाणी आलेलो नाही."

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ टेस्ट सामन्यांच्या ५ डावात ३१ रन्स केले होते. फॉर्ममध्ये परत येण्यासाठी रोहितने रणजी ट्रॉफी देखील खेळली. मात्र तिथेही त्याची बॅट शांतच होती. जम्मू आणि काश्मीरविरुद्ध रोहितने पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात २८ रन्स केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati rahuri bypolls election results : पहिल्या फेरीअखेर सुनेत्रा पवार 6500 मतांनी आघाडीवर

Weight Loss Drink: वेट लॉससाठी वरदान! नारळ पाणी आणि सब्जा ड्रिंक, कधी आणि कसं प्यायचं? जाणून घ्या

Riteish-Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिसवर सुसाट; रितेश भाऊंनी रविवारी केली छप्परफाड कमाई, रचला नवा इतिहास

Handvo Chilla Recipe: सकाळच्या हेल्दी नाश्त्यासाठी बनवा हांडवो चिल्ला, सोपी रेसिपी जाणून घ्या

Election Result Live : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर

SCROLL FOR NEXT