Rohit Sharma, India vs Australia 3rd Test yandex
Sports

Ind vs Aus 3rd Test : रोहित शर्मा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, नेमकं घडलं तरी काय?

India Vs Australia 3rd Test at brisbane : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर होणार आहे. १४ डिसेंबरपासून हा सामना सुरू होत आहे. दुसऱ्या कसोटीतील पराभवाच्या धक्क्यानंतर रोहित शर्मा मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.

Nandkumar Joshi

Team India : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दारूण पराभव झाला होता. आता तीच चूक रोहित शर्मा तिसऱ्या कसोटीत करणार नाही. त्यामुळं तो कदाचित मोठा निर्णय घेऊ शकतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा कसोटी सामना हा ब्रिस्बेनच्या गाबा मैदानात १४ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यात स्वतः कर्णधार रोहित शर्मा सलामीला खेळण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा पहिला कसोटी सामना खेळू शकला नव्हता.

जसप्रीत बुमराहनं नेतृत्व सांभाळलं आणि तो सामना जिंकला. केएल राहुलनं डावाची सुरुवात केली होती. पर्थ कसोटीत त्यानं केलेल्या कामगिरीमुळं अॅडलेडमध्ये डे-नाइट कसोटी सामन्यात पुन्हा सलामीला येण्याची संधी मिळाली. तर रोहित शर्मा मधल्या फळीत खेळला. या कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारताला धूळ चारली. त्यामुळं रोहित शर्मा आता मोठा निर्णय घेण्याच्या विचारात आहे, असं कळतं.

रोहित शर्मा आणि टीमचा ब्रिस्बेन कसोटीसाठी जोरदार सराव सुरू आहे. रोहित शर्मा सुद्धा नव्या चेंडूनं नेटमध्ये प्रॅक्टिस करताना दिसला. कदाचित रोहित शर्मा हा गाबाच्या मैदानावर यशस्वी जयस्वालसोबत सलामीला उतरू शकतो, असा अंदाज यावरून लावला जात आहे.

रोहित शर्मा भारताकडून एकूण ६५ कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्याने ४२७९ धावा केल्या आहेत. त्यात १२ शतके देखील आहेत. ४२ सामन्यांत रोहित सलामीला उतरलाय. त्यानं ४४ च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.

तर सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ५० च्या सरासरीने धावा कुटल्या आहेत. तर तीन शतके देखील झळकावली आहेत. सलामीला त्याने ९ कसोटी शतकं ठोकली आहेत. रोहितनं २२ कसोटी सामन्यांत संघाचं नेतृत्व केलंय. पण त्यात फलंदाजीत तो खास कामगिरी करू शकलेला नाही. या कसोटी सामन्यांत त्याच्या धावांची सरासरी ३२.४२ इतकी आहे. तर त्यानं १९७३ धावाच केल्या आहेत. कर्णधार म्हणून रोहितनं फक्त चार शतकं तडकावली आहेत.

आता रोहित शर्मा सलामीला येणार याचा अर्थ केएल राहुल मधल्या फळीत फलंदाजीला येणार असा होतो, असं मानलं जात आहे. रोहित आणि जयस्वाल सलामीला येऊ शकतात. तर तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल, त्यानंतर विराट कोहली मैदानात उतरू शकतात. केएल राहुल पाचव्या आणि रिषभ पंत हा सहाव्या क्रमांकावर खेळण्यासाठी येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT