rohit sharma jasprit bumrah canva
Sports

Duleep Trophy 2024: पक्के मित्र मैदानात भिडणार! रोहित- बुमराह येणार आमनेसामने

Rohit Sharma Will Play Duleep Trophy: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी भारतीय खेळाडू दुलीप ट्रॉफी स्पर्धा खेळताना दिसून येणार आहेत.

Ankush Dhavre

Rohit Sharma Jasprit Bumrah Will Play Duleep Trophy: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. टी-२० मालिकेत भारतीय संघाने बाजी मारली. तर वनडे मालिकेत श्रीलंकेने भारतीय संघावर २-० ने विजय मिळवला.

ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ ४० दिवसांच्या ब्रेकवर आहे. भारतीय संघ या कालावधीत आतंरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुर राहणार आहे. दरम्यान बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारतात दुलीप ट्रॉफीचा थरार रंगणार आहे.

भारतात रंगणार दुलीप ट्रॉफी स्पर्धेचा थरार

बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहे.

बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंना दुलीप ट्रॉफी खेळण्यासाठी सांगण्यात आलं आहे. त्यामुळे विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहसारखे दिग्गज खेळाडू आता एकमेकांविरुद्ध खेळताना दिसून येणार आहेत.

रोहित - बुमराह आमनेसामने?

दुलीप ट्रॉफी ही भारतीय संघातील खेळाडूंसाठी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वीची निवड चाचणी असणार आहे. भारतीय संघातील प्रमुख्य सदस्यांनाही दुलीप ट्रॉफी खेळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे. तर मोहम्मद शमी या स्पर्धेतून कमबॅक करताना दिसून येऊ शकतो. यासह जसप्रीत बुमराह देखील दुलीप ट्रॉफी खेळताना दिसून येऊ शकतो.

मात्र मोहम्मह शमी कमबॅक करत असल्यामुळे तो ही स्पर्धा खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. बुमराहला विश्रांती देऊन शमीला भारतीय संघात संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

इशान किशन करणार कमबॅक

या स्पर्धेत इशान किशन कमबॅक करताना दिसून येऊ शकतो. भारतीय संघात बॅकअप यष्टीरक्षक फलंदाज म्हणून इशान किशन हा सर्वोत्तम पर्याय आहे. रणजी ट्रॉफी खेळत नसल्याने त्याला सेन्ट्रन कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर करण्यात आलं होतं. मात्र भारतीय संघात कमबॅक करायचं असेल, तर त्याला कुठल्याही परिस्थितीत रेड बॉल क्रिकेट खेळावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Kale Case : पुण्यात पुन्हा गँगवॉर! गणेश काळेवर गोळ्या झाडतानाचा CTTV व्हिडिओ समोर

माजी मंत्र्यांच्या नातवाचा पाय खोलात; भाजप नेत्याकडून पैसे थकवल्याचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: कार्तिकीच्या निमित्ताने चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी

Satara Tourism : कास पठाराजवळ लपलाय निसर्गाचा अद्भुत नजारा, थंडीत येथे आवर्जून जा

Crime News: बायकोसोबत अवैध संबंधाचा संशय, नवऱ्याने केली तरुणाची गळा चिरून हत्या

SCROLL FOR NEXT