team india twitter
Sports

World Cup 2023: ना शमी,ना विराट, ना अय्यर! टीम इंडियाचा खरा हिरो रोहितच;दिग्गज खेळाडूचं विधान

Nasir Hussain On Team India: या सामन्यानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

Nasir Hussain On Rohit Sharma:

भारतीय संघाने सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडवर ७० धावांनी जोरदार विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल झाला आहे.

या सामन्यात विजय मिळवल्यानंतर विराट कोहली,श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी यांची जोरदार चर्चा सुरु आहे.

कारण विराट कोहलीने याच सामन्यात वनडे कारकिर्जदीतील ५० वं शतक पूर्ण केलं. तर श्रेयस अय्यरने वर्ल्डकप स्पर्धेत बॅक टू बॅक दुसरं शतक झळकावलं. गोलंदाजी करताना मोहम्मद शमी हिरो ठरला. त्याने या सामन्यात ७ गडी बाद केले.

या दमदार कामगिरीमुळे तीनही खेळाडू जोरदार चर्चेत आहे. मात्र इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैनचं म्हणणं आहे की, विराट, शमी किंवा अय्यर नव्हे तर रोहित या विजयाचा खरा हिरो आहे.

रोहित या सामन्याचा हिरो का आहे?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत सलग १० सामने जिंकले आहेत. सेमीफायनलचा सामना जिंकून भारतीय संघाने वर्ल्डकपची फायनल गाठली आहे.

आता त्याला भारतासाठी वनडे वर्ल्डकप ट्रॉफी जिंकणारा तिसरा कर्णधार बनण्याची संधी असणार आहे. रोहितने नेतृत्वासह फलंदाजीतही दमखम दाखवला आहे. त्याने प्रत्येक सामन्यात भारतीय संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली आहे.

रोहित शर्माबाबत बोलताना नासिर हुसैन म्हणाला की,' तर उद्या विराट, शामी आणि अय्यरच्या हेडलाईन्स छापल्या जातील. मात्र या भारतीय संघाचा खरा हिरो तर रोहित शर्मा आहे.' (Latest sports updates)

रोहितने नेतृत्व करत असताना क्षेत्ररक्षणात केलेले बदल, गोलंदाजीत केलेले बदल आणि मुख्य बाब म्हणजे फलंदाजीत करुन दिलेली आक्रमक सुरुवात. या सर्व गोष्टी भारतीय संघासाठी फायदेशीर ठरल्या आहेत.

रोहितने या स्पर्धेतील १० सामन्यांमध्ये ५५ च्या सरासरीने आणि १२४.१५ च्या स्ट्राईक रेटने ५५० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ३ अर्धशतक झळकावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

Election Commission :...नाही तर माफी मागावी लागेल; निवडणूक आयोगाची राहुल गांधींना ७ दिवसांची डेडलाईन

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

SCROLL FOR NEXT