Rohit Sharma Injury update Hardik Pandya saam tv
Sports

Rohit Sharma Injury Update : रोहित शर्मा कमबॅक कधी करणार? फिटनेसबाबत हार्दिक पंड्यानं दिली महत्वाची अपडेट

Rohit Sharma Injury Update, MI vs PBKS : दुखापतीमुळं रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या संघातून बाहेर झाला आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नाही. तो संघात कधी परतणार, असा प्रश्न आता चाहत्यांना पडला असून, हार्दिक पंड्याने त्याच्या फिटनेसबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

Nandkumar Joshi

यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या विजयानंतर पराभवाची मालिका सुरूच असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी आजचा पंजाब किंग्जविरुद्ध होणारा सामना अत्यंत महत्वाचा आहे. मात्र, या सामन्यात मुंबईचा राजा रोहित शर्मा खेळत नाही. दुखापतीमुळं तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्धच्या सामन्यात रोहितला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळं मैदानातून बाहेर जावं लागलं होतं.

रोहित शर्मा संघात नसल्यानं मुंबई इंडियन्स संघ आणि चाहत्यांचीही चिंता वाढली आहे. तो पुन्हा संघात कधी येईल, असा प्रश्न पडला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या (Mumbai Indians Captain Hardik Pandya) यानं त्याच्या फिटनेसबाबत आणि तो कधी संघात कमबॅक करणार याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

पंजाबविरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीवेळी हार्दिक पंड्यानं रोहित शर्माच्या फिटनेसबाबत माहिती दिली. रोहित पुढील काही सामने संघाबाहेर राहू शकतो, असे तो म्हणाला. पण तो कधीपर्यंत संघात परतणार याबाबत स्पष्टपणे सांगितलं नाही.

रोहित शर्मा, सँटनरही संघाबाहेर

रोहित शर्मा याला मागील सामन्यातच दुखापत झाली होती. त्यामुळे तो सध्या संघाबाहेर आहे. त्याला तंदुरुस्त होण्यासाठी वेळ लागणार आहे. तो सामने खेळण्यास फिट आहे की नाही हे काही दिवसांनी बघू, असे हार्दिक पंड्या म्हणाला.

मिचेल सँटनर देखील आजारी असल्याने तो पंजाबविरुद्धच्या सामन्यात खेळत नाही. या सामन्यात संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. रोहितच्या जागी क्विंटन डीकॉक, तर सँटनरच्या जागी मयंक रावत याला संधी देण्यात आली आहे.

मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर हार्दिकची प्रतिक्रिया

या आयपीएल पर्वात मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. त्यावर हार्दिकने प्रतिक्रिया दिली. आम्ही आतापर्यंत बरं क्रिकेट खेळलो आहोत. पण आम्ही काही सामन्यांत किंवा काही संधींचा फायदा घेऊ शकलो नाहीत. त्यामुळे आम्हाला सलग पराभवाला सामोरे जावे लागले. पण आजच्या सामन्यात आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. निकाल आमच्या बाजूने लागेल, असा आम्हाला विश्वास आहे, असं हार्दिक पंड्या म्हणाला.

मुंबईविरुद्ध पंजाबनं जिंकला टॉस

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकली. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. मुंबईने संघात दोन बदल केले. तर पंजाब किंग्जने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. मुंबईला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे. त्यामुळे पंजाबसमोर मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे.

मुंबई इंडियन्स - प्लेइंग इलेव्हन

क्विंटन डी कॉक, रयान रेकल्टन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शेरफेन रदरफोर्ड, नमन धीर, मयंक रावत, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर आणि जसप्रीत बुमराह.

पंजाब किंग्ज प्लेइंग ११

प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या, श्रेयस अय्यर, कुपर कोनोली, शशांक सिंह, मार्कस स्टॉयनिस, मार्को जान्सन, जेवियर बार्टलेट, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंगस, युजवेंद्र चहल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला; भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या जवळच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या, घटनाक्रम आला समोर

मंत्री छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? राजकीय घडामोडींना वेग|VIDEO

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर

West bengal CM Race: भाजपचं धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, महिला नेत्या अचानक दिल्लीत धडकल्या

लग्नाआधी वजन घटवण्याचं औषध? दिखाव्याच्या दुनियेत आरोग्याशी खेळ

SCROLL FOR NEXT