क्रीडा

ICC Rankings: एकदिवशीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा ठरला 'सुपरहिट', ICC रॅंकिंगमध्ये विराट कोहलीलाही सोडलं मागे

ICC Rankings: भारतीय कर्णधार रोहित शर्माने आयसीसी वनडे फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत आश्चर्यकारक कामगिरी केलीय. हिटमॅन रोहित भारतीय क्रिकेटचा सध्याचा नंबर-1 वनडे फलंदाज बनलाय. युवा स्टार शुभमन गिल आणि रन मशीन विराट कोहलीलाही मागे टाकलंय.

Bharat Jadhav

ICC वनडे एकदिवशीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय कर्णधार रोहित शर्माने मोठी झेप घेतलीय. रोहित शर्मा सध्या वनडे सामन्यातील क्रमांक एकचा फलंदाज बनलाय. त्याने युवा स्टार शुभमन गिलला मागे टाकून त्याने हे स्थान मिळवलंय. विराट कोहली देखील रोहित शर्माच्या पाठीमागे आहे. रोहित शर्माने त्याचा सहकारी फलंदाज शुभमन गिलकडून दुसरे स्थान हिसकावले आहे. हिटमॅन आता वनडे फॉरमॅटमध्ये जगातील नंबर दोनचा बॅट्समन बनलाय. तर पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम पहिल्या स्थानावर कायम आहे.

रोहित शर्मा आयसीसी वनडे क्रमवारीत नंबर-२ वर पोहोचलाय. रोहित लवकरच बाबर आझमच्या स्थानावर पोहोचू शकतो. भारतीय कर्णधारही बाबर आझमच्या अव्वल रँकिंगच्या जवळ आलाय. बाबर आझमच्या ८२४ गुणांपेक्षा तो केवळ ५९ गुणांनी मागे आहे. भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल तिसऱ्या स्थानावर घसरलाय. तर विराट कोहली या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत रोहितने चमकदार कामगिरी केली होती. या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताचा ०-२ असा पराभव झाला होता. रोहितने ३ सामन्यात ५२.३३ च्या सरासरीने आणि १४१.४४ च्या स्ट्राइक रेटने १५७ धावा केल्या, यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तिन्ही सामन्यांत त्याने जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. पण तो त्याच्या धावा तिप्पट अंकात बदलू शकला नाही. रोहितची या मालिकेत सर्वात्तम धावसंख्या ६४ धावा होती.

कोहली चौथ्या स्थानावर

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत विराट कोहलीची कामगिरी चांगली नव्हती. त्याने तीन सामन्यांत केवळ ५८ धावा केल्या. युवा स्टार फलंदाज गिलही श्रीलंकेच्या भूमीवर संघर्ष करताना दिसला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ९६ धावांची शानदार खेळी खेळणारा श्रीलंकेचा फलंदाज अविष्का फर्नांडोने २० स्थानांची झेप घेत ६८ व्या स्थानावर पोहोचला आहे. आयरिश फलंदाज हॅरी टेक्टरही ७४६ रेटिंग गुणांसह टॉप-५ मध्ये कायम आहे.

कुलदीप यादव नंबर-१ भारतीय बॉलर

कुलदीप यादव एकदिवशीय क्रिकेटमध्ये हा भारताचा नंबर-१ गोलंदाज बनलाय. केशव महाराज, जोश हेझलवूड आणि ॲडम झम्पा हे खेळाडू गोलंदाजांच्या वनडे क्रमवारीत अनुक्रमे टॉप-३ मध्ये आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत या डावखुऱ्या फिरकीपटूने ३ सामन्यांत ३.४० च्या इकॉनॉमी रेटने ४ विकेट घेतल्या. तर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आठव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे मोहम्मद सिराज ५ व्या स्थानावरुन घसरून १० व्या स्थानावर आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT