rohit sharma instagram
Sports

Viral Video: रोहित शर्मा होपलेस.., हिटमॅन आऊट ऑफ फॉर्म; 88 वर्षांच्या आजीबाई भडकल्या-VIDEO

88-year-old Indian fan has gone viral for criticising India’s poor performance: ८८ वर्षांच्या आजीबाईंनी रोहित शर्मा आणि भारतीय संघावर जोरदार टीका केली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाला मायदेशात न्यूझींडविरुद्ध खेळताना व्हॉईटवॉशचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत ३-१ ने पराभवाचा सामना करावा लागला.

या पराभवामुळे भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करता आलेला नाही. भारताने सलग दोनदा या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र पहिल्यांदाच भारतीय संघ फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरला आहे.

या पराभवानंतर भारतीय खेळाडूंना जोरदार टिकेला सामोरं जावं लागलं. दरम्यान एका ८८ वर्षांच्या आजीबाईंचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

शशांक जेकब या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात ८८ वर्षांच्या आजीबाई रोहित शर्मावर टीका करताना दिसून येत आहेत. व्हिडिओमध्ये असलेल्या आजीबाई भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना म्हणतात, ' रोहित शर्मा होपलेस आहे. त्याने जी काही कामगिरी केली आहे, ती निराशानजनक आहे.' आजीबाईंच्या मते, भारतीय संघ मजबूत संघ आहे. मात्र अशा मजबूत संघाकडून अशी कामगिरी, हे खूप निराशाजनक आहे.

हा व्हिडिओ तुफान व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. आजीबाई या व्हिडिओमध्ये भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल स्पष्टपणे बोलल्या आहेत. काही युजर्सला आजीबाईंचा स्पष्ट वक्तेपणा आवडला आहे. तर काहींनी टीका देखील केली आहे.

भारताचा पराभव

या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा उपलब्ध नव्हता. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. त्यानंतर पुढील सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

मालिका १-१ ने बरोबरीत आणल्यानंतर, मालिकेतील तिसरा सामना बरोबरीत राहिला होता. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यासह भारताने ही मालिका ३-१ ने गमावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT