Rohit Sharma Play Holi  Saam Tv
Sports

MI Holi : होळीच्या दिवशी रोहितचा खोडकरपणा; कॅमरामॅनच्या अंगावर मारला पाण्याचा फवारा व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharma Play Holi : मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये रोहितच्या चेहऱ्यावर रंग दिसत आहे आणि रोहित मुंबई इंडियन्सच्या स्पोर्ट्स स्टाफवर पाणी फेकताना दिसत आहे

Bharat Jadhav

Rohit Sharma Holi Video :

भारतीय क्रिकेट संघातील सर्वात गंमतीदार खेळाडू कोणी असेल तर म्हणजे रोहित शर्मा. परिस्थिती कशीही असो रोहित शर्मा आपला मजा मस्ती करणं सोडत नाही. आयपीएल २०२४ मध्येही त्यांचा हा स्वभाव सुटलेला नाही. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याने रोहित काहीसा नाराज असला तरी तो मजा मस्ती करताना दिसून आला. (Latest News)

मुंबई इंडियन्सच्या संघाने होळी खेळली त्यावेळी रोहितचा गंमतीदार स्वभाव सर्वाच्या चेहऱ्यावर हासू आणणारा आहे. रोहितने उत्साहाने होळी खेळली.रंग लावणाऱ्या सवंगड्यांना आणि पत्रकारांनादेखील त्याने रंग लावला. इतकेच नाही तर त्याने कॅमेरामॅनवर पाईपने पाण्याचा फवारा मारला. सोमवारी २५ मार्च रोजी देशभरात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकमेकांना रंग लावत देशवासियांनी हा सण साजरा केला.आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटर्सने सुद्धा होळीचा आनंद लुटला. मुंबई इंडियन्सने माजी कर्णधार रोहित शर्माचाही एक छोटा व्हिडिओ पोस्ट केलाय,या व्हिडिओमध्ये तो पाण्याचा फवारा मारताना दिसत आहे.रोहितच्या चेहऱ्यावर रंग लागलेला दिसत आहे. त्यावेळी त्याने व्हिडीओ बनवणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या मीडिया टीमच्या सदस्यावरही त्याने पाईपमधून पाण्याचा फवारा माराल, हे पाहून सर्वजण हसू लागले. त्याचा व्हिडिओ पाहून नेटकरी खूश झालेत.

रोहित आणि मुंबई इंडियन्सच नाही तर इतर संघांनीही होळीचा सण साजरी केली. कोलकाता नाईट रायडर्सपासून दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्सपर्यंत प्रत्येक फ्रँचायझीने मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला. जेव्हाही आयपीएलचा हंगामात होळी आली तर भारतीय खेळाडूंसह परदेशी खेळाडूही हा सण साजरा करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT