rohit sharma twitter
क्रीडा

Rohit Sharma Record: रोहितला नंबर १ सिक्सर किंग बनण्याची संधी! या बाबतीत ख्रिस गेलला सोडणार मागे

Most Sixes In World Cup: रोहितला मोठ्या विक्रमात ख्रिस गेलला मागे सोडण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Record In World Cup:

भारत आणि नेदरलँड या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळला जाणार आहे. हा सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रंगणार आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या भारतीय संघाने वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

या स्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने दमदार खेळ केला आहे. दरम्यान नेदरलँडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात रोहितकडे ख्रिस गेलला मागे सोडण्याची संधी असणार आहे.

एका वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड हा ख्रिस गेलच्या नावे आहे. ख्रिस गेलने २०१५ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत २६ षटकार मारले होते. तर या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी आणि ग्लेन मॅक्सवेल तिसऱ्या स्थानी आहे.

रोहितने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आतापर्यंत २२ षटकार मारले आहेत. तर मॅक्सवेलने देखील २२ षटकार मारले आहेत. ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडण्यासाठी रोहितला केवळ ५ षटकारांची गरज आहे.

रोहितने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार खेळ केला आहे. त्याने या स्पर्धेतील ८ सामन्यांमध्ये ४४२ धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्याने ५० चौकार आणि २२ षटकार मारले आहेत.

रोहितने एक शतक आणि दोन अर्धशतकं झळकावली आहेत. तो वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानी आहे. (Latest sports updates)

भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी..

भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत ८ सामने खेळले आहेत. हे सर्व सामने जिंकत भारतीय संघ १६ गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारतीय संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये पोहचणारा पहिला संघ ठरला आहे.

नेदरलँडविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघाचा सेमीफायनलचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Suraj Chavan Dance: बिग बॉस फेम सूरजचा नाद नाय! 'तांबडी चामडी' गाण्यावर केला डान्स; Video व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

8th Pay Commission: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगात किमान वेतन १८,००० नव्हे ३४५०० होणार

SCROLL FOR NEXT