Rohit Sharma Century Saam Tv
Sports

IND VS AUS 4th Test: फलंदाज म्हणून जे गावसकर - अझहरुद्दीनलाही नाही जमलं; ते करत हिटमॅन रचणार इतिहास

Rohit Sharma Century: या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माला एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Record: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली होती.

तर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून विजय मिळवला होता. सध्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. त्यामुळे ९ मार्चपासून सुरू होणारा अहमदाबाद कसोटी सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

दरम्यान या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माला एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. (Latest sports updates)

अहमदाबाद कसोटीत रोहित रचणार इतिहास..

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या मालिकेत एकही मोठी खेळी करू शकला नाहीये. मात्र अहमदाबाद कसोटीत त्याला केवळ २१ धावा करताच एक मोठा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी असणार आहे. २१ धावा करताच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७ हजार धावा पूर्ण करणार आहे.

आतापर्यंत त्याने १६,९८९ धावा केल्या आहेत. सुनील गावसकरांनी आपल्या कारकीर्दीत १३,२१४ धावा केल्या होत्या. तर मोहम्मद अझहरुद्दीन यांनी १५,५९३ धावा केल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज..

सचिन तेंडुलकर -३४,३५७ धावा

विराट कोहली - २५,०४७ धावा

राहुल द्रविड -२४,२०८ धावा

सौरव गांगुली -१८,५७५ धावा

एमएस धोनी - १७,२६६ धावा

वीरेंद्र सेहवाग -१७,२५३ धावा

रोहित शर्मा - १६,९७९ धावा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज...

सचिन तेंडुलकर - ३४,३५७ धावा

कुमार संगकारा - २८,०१६ धावा

रिकी पाँटिंग - २७,४८३ धावा

महेला जयवर्धने - २५९५७ धावा

जॅक कॅलिस - २५,५३४ धावा

विराट कोहली- २५,०४७ धावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT