rohit sharma  yandex
Sports

Rohit Sharma Record: रोहित शर्माला इतिहास रचण्याची संधी! या मोठ्या रेकॉर्डमध्ये दिग्गज कर्णधाराला सोडणार मागे

Rohit Sharma, Most Test Wins For India: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

Indian Test Cricket Record: भारत आणि श्रीलंका यांच्यातील मर्यादीत षटकांची मालिका झाल्यानंतर भारतीय खेळाडूंना ४३ दिवसांची विश्रांती मिळाली आहे. ही मालिका झाल्यानंतर आता भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

या मालिकेला येत्या १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान या मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्माला एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. (Rohit Sharma Record)

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत तर दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये रंगणार आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात कर्णधार रोहित शर्माला मोठ्या रेकॉर्डमध्ये मोहम्मद अजहरुद्दीनला मागे सोडण्याची संधी असणार आहे.

विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने ४० कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर रोहित शर्माच्या कसोटी रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं, तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने १६ कसोटी सामन्यांपैकी १० सामने जिंकले आहेत. यादरम्यान ४ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर २ सामने ड्रॉ राहिले आहेत.

इथून पुढे भारतीय संघाला ५ कसोटी सामने खेळायचे आहेत. भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे.

दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. भारतीय संघाने पाचही सामने जिंकले, तर रोहितच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद होणार आहे. रोहित शर्माकडे सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या बाबतीत मोहम्मद अजहरुद्दीनला मागे सोडू शकतो. मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या नावे १५ कसोटी सामने जिंकण्याची नोंद आहे.

भारतीय संघासाठी सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे कर्णधार

विराट कोहली- ४० सामने

एमएस धोनी- २७ सामने

सौरव गांगुली - २१ सामने

मोहम्मद अजहरुद्दीन- १४ सामने

रोहित शर्मा- १० सामने

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni Photos: पारंपारिक साडी अन् सौंदर्य, सोनाली कुलकर्णीचं दिवाळी स्पेशल फोटोशूट

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी धुळेकरांची लगबग

Corruption Exposed : २.६२ कोटींची रोकड, ९ फ्लॅट अन् लक्झरी गाड्या; सरकारी अधिकाऱ्याला CBI ने लाच घेताना रंगेहात पकडले

Kamali: कमळी आणि सरोजची होणार तुरुंगात भेट? 'कमळी' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट

कल्याण - डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली; शरद पवार गटातील बडा नेता गळाला लागला

SCROLL FOR NEXT