Rohit Sharma  Saam Tv
Sports

Rohit Sharma: जे कोहली अन् गांगुलीलाही नाही जमलं ते रोहितने करून दाखवलं! धोनीच्या मोठ्या विक्रमाची केली बरोबरी

दिल्ली कसोटीत ६ गडी राखून विजय मिळवताच रोहित शर्माने एमएस धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. जो विक्रम कर्णधार म्हणून विराट कोहली आणि सौरव गांगुलीला देखील करता आला नाहीये.

Saam TV News

Rohit Sharma : कर्णधार म्हणून रोहित शर्मा भारतीय संघासाठी जोरदार कामगिरी करतोय. नुकताच भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-० ची आघाडी घेतली आहे.

दिल्ली कसोटीत ६ गडी राखून विजय मिळवताच रोहित शर्माने एमएस धोनीच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. जो विक्रम कर्णधार म्हणून विराट कोहली आणि सौरव गांगुलीला देखील करता आला नाहीये. (Latest Sports Updates)

या विक्रमाची केली बरोबरी..

मोहालीच्या मैदानावर २०२२ मध्ये श्रीलंकाविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्मा पहिल्यांदा भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यात भारतीय संघाने २२२ धावांनी विजय मिळवला होता.

तर दुसऱ्या कसोटी सामन्यात २३८ धावांनी विजय मिळवला होता. तसेच ऑस्ट्रेलियाविरुध्द सुरु असलेल्या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांमध्ये देखील भारतीय संघाने विजय मिळवला आहे. यासह रोहित शर्माने कर्णधार म्हणून सलग ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यापूर्वी बाबर आजम आणि एमएस धोनी यांनी हा कारनामा केला होता. या विक्रमात त्याने एमएस धोनीची बरोबरी केली आहे.

विराट कोहलीने २०१४ मध्ये पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर सौरव गांगुली यांनी भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना पहिला सामना जिंकला होता. मात्र चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

कर्णधार म्ह्णून रोहित शर्मा हिट..

रोहित शर्मा कर्णधार म्हणून हिट ठरतोय. तो गोलंदाजीमध्ये योग्यवेळी बदल करतोय. तर अचूक डीआरएस देखील घेतोय. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात रोहित शर्मा हा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने मुंबई इंडियन्स संघाला ५ वेळेस जेतेपद जिंकून दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असे सांगत भोंदू बाबाकडून 1 कोटी 87 लाखाची फसवणूक

CM फडणवीसांनी काल 'आदेश' दिला; आज पोलिसांनी भाजप नेत्यालाच उचललं!

Shocking : बंद फ्लॅटमधून दुर्गंधी, दरवाजा तोडला, आतील दृश्य बघून सगळेच हादरले; आई आणि ४ मुलं निपचित पडली होती...

Maharashtra Politics: ते पाकिस्तानलाही सोबत घेतील; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका|VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा,ऑक्टोबरचे ₹१५०० कधी येणार?

SCROLL FOR NEXT