rohit sharma dance twitter
Sports

Team India Come Home: जल्लोष तर होणारच! भारतात येताच रोहितचा फॅन्ससोबत भन्नाट डान्स, पाहा VIDEO

Rohit Sharma Dance Video: भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघ भारतात दाखल जाणार आहे. दरम्यान भारतात आल्यानंतर रोहित शर्माने डान्स केला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय संघात मायदेशात दाखल झाला आहे. आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं आणि दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. दरम्यान भारतीय संघ मायदेशात परतला असून जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे. दिल्ली विमानतळाबाहेर येताच कर्णधार रोहित शर्माने डान्स केला आहे.

बारबाडोसला गेलेलं एअर इंडियाचं विमान भारतीय खेळाडूंना घेऊन दिल्लीत लँड झालं आहे. भारतात आल्यानंतर भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत नाश्ता करणार आहे. त्यानंतर ५ वाजता मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे भारतीय संघाची विजयी रॅली काढली जाणार आहे. सध्या भारतीय खेळाडू दिल्लीत दाखल झाले असून, हे खेळाडू दिल्ली विमानतळापासून १२ किमी अंतरावर असलेल्या ITC maurya या हॉटेलमध्ये थांबणार आहेत.

दिल्लीतील या आलिशान हॉटेलमध्येही भारतीय संघाच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. हॉटेलच्या शेफने भारतीय संघाच्या जर्सीच्या रंगाचा केक तयार केला आहे. हॉटेलमध्येही जोरदार सेलिब्रेशन केलं जाणार आहे.

तसेच दिल्ली विमानतळावरून बाहेर येताच विराट कोहली, राहुल द्रविड आणि इतर खेळाडू टीम बसमध्ये बसताना दिसून आले. दरम्यान दिल्ली विमानतळाबाहेर कर्णधार रोहित शर्मा डान्स करताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

भारतीय संघाने २९ जून रोजी बारबाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. त्यानंतर १ जुलैला भारतीय संघ मायदेशी येण्यासाठी रवाना होणार होता. मात्र चक्रीवादळामुळे भारतीय खेळाडू भारतात येऊ शकले नव्हते. त्यानंतर बुधवारी एअर इंडियाचं स्पेशल चार्टर्ड विमान बारबाडोसमध्ये दाखल झालं आणि गुरुवारी भारतीय खेळाडू मायदेशात दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Health: पावसाळ्याच्या दिवसात सकाळी उठल्यावर ही 3 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

नव्या नवरीसाठी १ ग्रॅम मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स; गळ्यात दिसतील उठून

Beed Crime: बीड हादरले! ऊसतोड मजुराचे अपरहण, ४ दिवस डांबून ठेवत रक्त येईपर्यंत मारहाण; तोंडात लघुशंका केल्याचा आरोप

Kalyan Accident News : कल्याणमध्ये भीषण अपघात! विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी भरधाव रिक्षा उलटली, ६ जण गंभीर जखमी

Maharashtra News Live Update: संत मुक्ताईंच्या पालखीचा मार्ग खडतर

SCROLL FOR NEXT