rohit sharma saam tv
क्रीडा

Rohit Sharma Record: सिक्स हिटिंग मशिन!अर्धशतकासह हिटमॅनने रचला इतिहास; वनडेत पूर्ण केली ट्रिपल सेंच्युरी

Ankush Dhavre

Rohit Sharma Record:

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी १९१ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने तुफान फटकेबाजी केली. यादरम्यान त्याने एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

रोहित शर्माने या डावात तुफानी अर्धशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. दरम्यान डावातील चौथा षटकार मारताच त्याने वनडे क्रिकेटमध्ये ३०० षटकार पूर्ण केले आहेत. हा कारनामा त्याने हारीस रउफच्या नवव्या षटकात केला आहे. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने गगनचुंबी षटकार मारत हा कारनामा केला आहे.

सर्वात जलद ३०० षटकार मारणारा पहिलाच फलंदाज..

रोहित शर्मा हा वनडेत सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा फलंदाज आहे. तर वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३०० षटकारांचा पल्ला गाठणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने वेस्टइंडिजचा स्टार फलंदाज ख्रिस गेललाही मागे सोडलं आहे. रोहितने हा कारनामा २५४ व्या सामन्यात केला आहे.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज..

शाहिद आफ्रिदी - ३५१ षटकार

ख्रिस गेल- ३३१ षटकार

रोहित शर्मा - ३०१ षटकार

सनाथ जयसूर्या - २७० षटकार

एमएस धोनी- २२९ षटकार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT