भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्णधारांनाही जे नाही जमलं, ते रोहितने करुन दाखवलं आहे.
आशियाई क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज कर्णधार होऊन गेले, ज्यात एमएस धोनी, इमरान खान, अर्जून रणतुंगा आणि कपिल देवसारख्या कर्णधारांचा समावेश आहे. या कर्णधारांनी आपल्या देशासाठी आपल्या संघासाठी खूप काही केलं. मात्र यापैकी कुठल्याही कर्णधाराला आयसीसीच्या स्पर्धेत सलग २ वेळेस विजय मिळवता आला नव्हता. रोहित असा रेकॉर्ड करणारा आशियातील पहिलाच कर्णधार ठरला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने सलग २ आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. २०२४ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. तर २०२५ मध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करत जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे.
जगात केवळ ४ असे कर्णधार आहेत ज्यांना सलग २ वेळेस आयसीसीची ट्रॉफी जिंकता आली आहे. यात रोहित शर्मा हा आशियातील एकमेव कर्णधार आहे. यापूर्वी एमएस धोनीने आयसीसीच्या ट्रॉफी जिंकल्या आहेत. मात्र त्याला सलग विजय मिळवता आला नव्हता.
यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगने २००६ वर्ल्डकप आणि त्यानंतर २००७ चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. सर्वात आधी वेस्टइंडिजचे माजी कर्णधार क्लाईव्ह लॉयड यांनी हा कारनामा करुन दाखवला होता. त्यांनी १९७५ आणि १९७९ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत वेस्टइंडिजला विजय मिळवून दिला होता.
आयसीसीच्या सर्वाधिक ट्रॉफी जिंकण्याचा रेकॉर्ड हा रिकी पाँटींगच्या नावावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाला २ वेळेस चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २ वेळेस वर्ल्डकप जिंकून दिला आहे. त्यानंतर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा नंबर लागतो.
धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना, भारतीय संघाने २००७ टी-२० वर्ल्डकप, २०११ वनडे वर्ल्डकप आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीत विजय मिळवला होता. आता रोहित शर्माने देखील असा कारनामा २ वेळेस करुन दाखवला. ही आयसीसी ट्रॉफीची हॅट्रीक होऊ शकली असती, मात्र २०२३ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.