rohit sharma backed prasidh krishna google
क्रीडा

Rohit Sharma Statement: पदार्पणात फ्लॉप ठरलेल्या प्रसिद्ध कृष्णाला रोहितचा पाठिंबा; म्हणतो, ' त्याच्याकडे तो ॲटीट्युड..'

Ankush Dhavre

Rohit Sharma Backed Prasidh Krishna:

स्टार वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत पदार्पण करण्याची संधी देण्यात आली. पूर्णपणे फिट नसल्यामुळे मोहम्मद शमी या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याची जागा भरून काढण्यासाठी प्रसिद्ध कृष्णाला पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती.

मात्र तो या संधीचा फायदा घेऊ शकला नाही. या सामन्यात त्याने ४.७० च्या इकॉनॉमिने धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याला केवळ १ गडी बाद करता आला. या सुमार कामगिरीनंतर त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान कर्णधार रोहित शर्मा त्याचा बचाव करताना दिसून आला आहे.

प्रसिद्ध कृष्णाबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, ' तो थोडा अननुभवी आहे. मात्र त्याच्यात इथे येऊन खेळण्याची क्षमता आहे. आमच्याकडे जे गोलंदाज आहेत ते काही दुखापतग्रस्त आहेत तर काही उपलब्ध नाहीत. त्यामुळे आम्ही त्याच गोलंदाजांना संधी दिली जे उपलब्ध आहेत. आम्ही आधी परिस्थिती बघतो , कोणाविरुद्ध खेळणार आहे हे बघतो आणि मग गोलंदाज निवडतो.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' मला मान्य आहे की, त्याला जास्त क्रिकेट खेळण्याचा अनुभव नाही. मात्र संघात आणखी ३ असे खेळाडू आहेत ज्यांना जास्त क्रिकेट खेळण्याचा अनुभव नाही. मात्र ते आले आणि त्यांनी दाखवून दिलं.' (Latest sports updates)

प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्या कसोटी सामन्याबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, ' प्रसिद्ध गेली २ वर्ष भारतीय संघासोबत आहे. मात्र कसोटी संघासोबत नाही. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची क्षमता दाखवून दिली आहे. मान्य आहे त्याला पहिल्या सामन्यात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात सर्वच नर्व्हस असतात. तो ही नर्व्हस असेल. मात्र तो स्वतः ला या फॉरमॅटमध्ये सिद्ध करू शकतो, असा गेम त्याच्याकडे आहे. '

तसेच रोहित पुढे म्हणाला की, ' आम्ही त्याला बॅक करतोय कारण त्याच्यात ती क्षमता आहे. त्याच्याकडे तो ॲटीट्युड आहे, जो आम्हाला पुढे जाण्यास मदत करेल.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu And Kashmir : निवडणूक निकलाआधी दहशतवाद्यांचा डाव उधळला; भारतीय लष्कराने केली शस्त्रे आणि स्फोटके जप्त

Diabetes Control: मधुमेह नियंत्रित ठेवायचाय? 'या' रंगाचे तीळ ठरतील फायदेशीर...

Maharashtra Politics: बच्चू कडूंना 'जोर का झटका', आमदार राजकुमार पटेल शिंदे गटाच्या वाटेवर?

India vs Pakistan: आज जिंकावंच लागेल! पाकिस्तानविरूद्ध 'या' चुका करणं टीम इंडियाला पडणार महागात

Marathi News Live Updates : एसटी बस थांब्यावरून विद्यार्थ्यांचे रस्त्यावर बसून ठीय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT