Rohit Sharma And Virat Kohli  Saam Tv
Sports

IND VS AUS: चेन्नईच्या मैदानावर घडणार इतिहास! रोहित अन् विराटला मोठ्या विक्रमात दिग्गजाची बरोबरी करण्याची संधी..

Rohit sharma and virat kohli record: या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडे एका दिग्गज खेळाडूची बरोबरी करण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

Ind Vs Aus 3rd ODI: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामान्यांच्या मालिकेतील अंतिम सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

कारण ही मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळू शकते. दरम्यान या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडे एका दिग्गज खेळाडूची बरोबरी करण्याची संधी असणार आहे.

चेन्नई वनडेत भारतीय संघातील दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्माकडे एक मोठा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी असणार आहे. दोघेही सचिनच्या विक्रमाची बरोबरी करू शकतात.

सचिनने ऑस्ट्रेलिया संघाविरुध्द खेळताना एकूण ९ शतके झळकावली आहेत. तर विराट आणि रोहितने आतापर्यंत ८-८ शतके झळकावली आहेत. त्यामुळे केवळ १ शतक झळकावताच दोघेही सचिनच्या विक्रमाची बरोबरी करू शकतात. (Latest sports updates)

तसेच वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि रोहीत शर्माच्या जोडीला आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी असणार आहे. दोघांनी भागीदारी करताना आतापर्यंत ४९९८ धावा केल्या आहेत.

दरम्यान २ धावा करताच दोघेही वनडे क्रिकेटमध्ये भागीदारी करताना ५ हजार धावा पूर्ण करणार आहेत. सर्वात जलद ५ हजार धावा करणारी ही पहिलीच जोडी ठरू शकते.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या , रवींद्र जडेजा, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि अक्षर पटेल .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

SCROLL FOR NEXT