Shreyas Iyer catch saam tv
Sports

Rohit Sharma: असंभव!!! श्रेयस अय्यरचा सुपरमॅन कॅच पाहून सूर्या-रोहितही थक्क; आयपीएलच्या इतिहासातील खतरनाक झेल

Shreyas Iyer catch: आयपीएल सामन्यात श्रेयस अय्यरने घेतलेला भन्नाट कॅच सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या अप्रतिम फील्डिंगने सर्वांना आश्चर्यचकित केले. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यातील हा क्षण ‘कॅच ऑफ द सीझन’ म्हणून चर्चेत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

गुरुवारी आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात मुंबईला सलग चौथ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दरम्यान या सामन्यात चर्चेचा विषय ठरला तो श्रेयस अय्यरने पकडलेला कॅच...श्रेयस अय्यरने त्याच्या जबरदस्त फील्डिंगने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. केवळ फलंदाज आणि कर्णधार म्हणूनच नाही तर उत्कृष्ट फील्डर म्हणूनही त्याने पुन्हा एकदा आपली छाप पाडलीये.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात श्रेयस अय्यरने घेतलेला कॅच सोशल मीडियावरही व्हायरल झालाय. हा पाहून केवळ फॅन्ससोबत सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा देखील अवाक् झाल्याचं पाहायला मिळालं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

अय्यरने पकडला तुफान कॅच

ही घटना मुंबई इंडियन्सच्या डावातील १८व्या ओव्हरमध्ये घडली. त्या वेळी मार्को यानसेन गोलंदाजी करत होते आणि हार्दिक पांड्या फलंदाजी करत होते. ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर हार्दिकचा शॉट नीट लागला नाही तरीही बॉल बाऊंड्री लाईनजवळ जात होता.

यावेळी बाऊंड्री लाईनजवळ असलेल्या श्रेयस अय्यरने उडी मारत बॉल पकडला आणि बाउंड्रीच्या बाहेर जाण्याआधीच हवेतच तो पुन्हा मैदानात फेकला. तिथेच उभ्या असलेल्या जेवियर बार्टलेटने तो कॅच घेतला आणि हार्दिकला आऊट करार देण्यात आला.

हा कॅच मुंबई इंडियन्सच्या डगआऊट जवळ पकडण्यात आला. त्या ठिकाणी सूर्या आणि रोहितने अगदी जवळून हा कॅच पाहिला. त्यामुळे ते दोघंही थक्क झाले होते. रोहितच्या चेहऱ्यावरून कॅच गेल्याचा विश्वास बसत नसल्याचं दिसून आलं. काही क्षणांच्या आत श्रेयसने हवेत उडी मारून बॉल पकडणं आणि त्याच क्षणी पुन्हा आत फेकणं ही गोष्ट खूपच कठीण होती.

‘कॅच ऑफ द सीझन’

सोशल मीडियावर या कॅचला आयपीएल २०२६ मधील ‘कॅच ऑफ द सीझन’ म्हटलं गेलंय. तसंच क्रिकेट फॅन्सकडून अय्यरचं जोरदार कौतुक होताना दिसतंय.

क्विंटन डिकॉकची शतकी खेळी

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा फलंदाज क्विंटन डिकॉकने उत्तम शतकीय खेळी केली. त्याने ६० चेंडूंमध्ये नाबाद ११२ रन्स केले. तर नमन धीरनेही अर्धशतकीय खेळी केली. याशिवाय कोणत्याही खेळाडूला १५ रन्सचा आकडाही गाठता आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnadurg Fort : रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यात दडली आहेत अनेक रहस्ये, एकदा जाणून घ्याच

Maharashtra News Live Update: शरद पवारांसोबतची आजची भेट राजकीय भेट नव्हती - दिलीप वळसे पाटील

पोलिसांचा शासकीय निधीवर डल्ला; ४७ लाख ६० हजार रुपयांचा अपहार,२ लिपिकांसह ५ पोलिसांवर गुन्हा दाखल

Rain Alert: राज्यासाठी पुढचे ३ दिवस महत्वाचे, अतिमुसळधार पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

Coal Block Case : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात सुरू होता खटला, आता क्लीन चिट; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT