Rohit Sharma saam tv
क्रीडा

टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये चालतं तरी काय ? पराभवानंतर खूद्द राेहित शर्मानं सांगितलं (पाहा व्हिडिओ)

आता टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे.

Siddharth Latkar

Rohit Sharma : आशिया करंडकानंतर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आम्ही मालिका खेळणार आहाेत. भारतीय संघात (indian team) काेणतीही कमतरता नाही. सर्व खेळाडू उत्तम आहेत. जोपर्यंत टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही खेळाडूंना आजमावू. स्पर्धांत यशस्वी हाेण्यासाठी विचार बदलण्याची गरज असती अशी चर्चा आम्ही नेहमी ड्रेसिंग रुममध्ये करताे असं कर्णधार राेहित शर्मा (rohit sharma) याने पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर मत व्यक्त केलं.

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत यंदा टीम इंडिया कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरली होती. भारतीय संघास दाेन सामन्यांत विजय मिळवता आला नाही. सुपर-4 मध्ये सलग दोन सामने गमावल्यानं आशिया करंडक स्पर्धेतून भारतास बाहेर रहावं लागणार अशी चिन्ह निर्माण झाली आहेत.

दरम्यान आगामी काळात भारतीय संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 विश्वकरंडक स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज आहे का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, सलग दोन पराभवानंतरही काळजी करण्याचं कारण नसल्याचं कर्णधार रोहित शर्माने आज माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केलं. विश्वकरंडकासाठी आमचा संघ जवळपास निश्चित झाला आहे आणि सध्याच्या खेळाडूंपैकी हे 90-95 टक्के असू शकतात असं म्हटलं आहे. काही बदल होणार आहेत ते अंतिम क्षणी केले जातील असेही शर्मानं स्पष्ट केले.

रोहित म्हणाला आम्ही अनेक सामने खेळत आहोत. आम्ही सातत्याने चांगला परफाॅर्मन्स करुन दाखविला आहे. उत्तम निकालही दिले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत सलग दोन सामन्यांमध्ये पराभव झाला म्हणून काळजी करण्यासारखी गोष्ट नाही. ड्रेसिंग रूममध्ये चांगले वातावरण आहे. जिंकल्यास भारावून जात नाही तर हरल्यास पोरांचे मनोबल खचू नये यासाठी हा सारा प्रयत्न असताे. संघ उत्तम असून आगामी काळात निश्चित संघ उत्तम कामगिरी करेल असा विश्वास राेहित शर्मानं व्यक्त केला.

टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर ?

टीम इंडियाने आशिया कपमध्ये सलग दोन विजयांनी सुरुवात केली होती. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 5 विकेट्सनी पराभव केला, त्यानंतर हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव केला. पण सुपर-4 मध्ये येऊन टीम इंडियाला म्हणावं तसं यश मिळालं नाही. सलग दोन सामने गमवावे लागले. सुपर-4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 5 गडी राखून पराभव केला, त्यानंतर श्रीलंकेनेही 6 विकेट्सने पराभूत केले. अशा स्थितीत आता टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Madhuri Dixit: धकधक गर्लचं लाजवाब सौंदर्य, फोटो पाहताच घायाळ व्हाल

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

SCROLL FOR NEXT