टी-२० वर्ल्डकप २०२६ मधील सुपर ८ च्या सामन्यांमध्ये रविवारी भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात संजू सॅमसनने ९७ रन्सची मॅचविनिंग खेळी केली. मात्र संजूची ही खेळी केवळ एक कमबॅक नव्हतं तर ते वर्ल्डक सुरू होण्यापूर्वी दिलेल्या वचनाची पूर्तता होती.
वर्ल्डकप सुरु झाल्यानंतर काही सामने संजू प्लेईंग ११ मधून बाहेर होता. एक चांगला ओपनर असूनही वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी संजूला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलेलं. इशान किशनच्या चांगल्या कामगिरीनंतर संजूला काही काळ वाट पाहाली लागली. असा काळ एका खेळाडूसाठी नेहमी मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरतो. परंतु यावेळी कर्णधार रोहित शर्मा त्याच्या मदतीला धावला होता.
आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असं दिसून आलं की, सामन्यापूर्वी रोहितने संजूच्या खांद्यावर हात ठेवला आणि मोठ्या भावाप्रमाणे त्याला मिठी मारली आणि म्हणाला, "कसा आहेस? दुःखी होऊ नकोस भावा. ही एक मोठी स्पर्धा आहे आणि संधी कधीही येऊ शकते."
संजूचा प्रवास सोपा नव्हता. आशिया कपमध्ये त्याला फलंदाजीमध्ये खालच्या क्रमांकावर पाठवण्यात आलं होतं. याचा परिणाम त्याच्या फॉर्मवर झालेला दिसला. त्यानंतर न्यूझीलंड सिरीजमध्ये खराब फॉर्मवरून त्याच्यावर टीका झाली. पण संजूने हार मानली नाही. तो डगआउटमधून आणि विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली शिकला.
मात्र यावेळी वेस्ट इंडिजविरुद्ध १९६ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संजूने नाबाद ९७ रन्स केले. टी२० वर्ल्डकपच्या इतिहासात भारताचा हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होता. सामन्यानंतर संजू म्हणाला, "गेल्या १०-१२ वर्षांपासून विराट आणि रोहित सारख्या दिग्गज खेळाडूंना डगआउटमधून जवळून पाहिलंय. त्यामुळे मी त्यांच्याकडून शिकलो आहे. दबावाखाली ते कशी कामगिरी करतात हे पाहणं खूप महत्वाचं होतं."
भारताने वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता त्यांचा सामना गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडशी होईल. हे तेच मैदान आहे जिथे संजू सॅमसनने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात फलंदाजीसाठी आपली पाळी येण्याची वाट पाहिली होती आणि आता तो संघाचा सर्वात मोठा सामना जिंकणारा खेळाडू असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.