IND vs WI: वडिलांचे अंत्यसंस्कार केले, चिता शांत होण्याआधीच देशासाठी खेळायला सज्ज, चाहत्यांचे डोळे पाणावले

emotional comeback story of Rinku Singh India: वडिलांच्या निधनानंतर भावनिक परिस्थितीत असलेला रिंकू सिंग आता भारत-वेस्ट इंडिज सामन्यापूर्वी पुन्हा टीम इंडियामध्ये सहभागी होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यात त्याच्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
emotional comeback story of Rinku Singh India
emotional comeback story of Rinku Singh Indiasaam tv
Published On

भारत आणि वेस्ट इंडिज १ मार्च रोजी कोलकाता मैदानावर आमनेसामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडू रिंकू सिंगवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र इतकं दुःख असूनही रिंकू सिंग आता पुन्हा टीम इंडियामध्ये सामील होण्यास सज्ज आहे. बीसीसीआय मॅनेजमेंटने माहिती दिलीये की, रिंकू सिंग २८ फेब्रुवारी रोजी कोलकाताच्या गार्डन्सवर होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुपर ८ सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये सामील होणार आहे.

वडिलांच्या निधनानंतर रिंकू टीम इंडियामध्ये होणार सामील

२७ फेब्रुवारी रोजी सकाळी रिंकूचे वडील खानचंद सिंग यांचं निधन झालं. त्याच्या वडिलांना कॅन्सरचं निदान झालं होतं. यानंतर त्यांना नोएडाच्या रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी त्यांचे अंत्यसंस्कार अलिगडमध्ये झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती.

वर्ल्डकप सोडून रिंकू वडिलांच्या अंत्यसंस्काराला पोहोचला होता. या क्षणी क्रिकेट जगतातील अनेकांनी त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. मात्र आता दुःख विसरून रिंकू उद्या होणाऱ्या सामन्यापूर्वी टीममध्ये सहभागी होणार आहे.

emotional comeback story of Rinku Singh India
T20 World Cup: रविवारी ईडन गार्डन्सवर पावसाची शक्यता? पाहा IND vs WI सामन्यापूर्वी कोलकात्याचं हवामान अपडेट

कोलकात्याला पोहोचली टीम इंडिया

टीम इंडिया ही टी-२० वर्ल्डकपची गतविजेती आहे आणि २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी कोलकातामध्ये पोहोचली. रिंकूच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर ८ सामन्यानंतर घरी परतला होता. नंतर तो झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नईमध्ये टीममध्ये परतला. या वर्ल्डकपमध्ये रिंकूची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही.

emotional comeback story of Rinku Singh India
Pakistan qualification chances: किवींचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर; ६४ रन्स आणि १३.१ ओव्हर्सचं समीकरण नेमकं कसं?

बहुतेक सामन्यांमध्ये त्याला शेवटच्या ओव्हर्समध्ये फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली आणि त्याने पाच डावांमध्ये २४ रन्स केले आहेत. या वर्षी खेळल्या गेलेल्या १० टी-२० सामन्यांमध्ये रिंकूने आठ डावांमध्ये ११५ रन्स केलेत. त्याची सरासरी २८.७५ आहे आणि स्ट्राईक रेट १३२.१८ आहे.

emotional comeback story of Rinku Singh India
T20 World Cup: भारत-पाकिस्तान फायनलमध्ये भिडणार? 'या' एका समीकरणामुळे कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा आमनेसामने

टीम इंडियासाठी वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यातील विजेता दक्षिण आफ्रिकेसह गट १ मधून सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहे. आता उद्याच्या सामन्यात सर्वांचं लक्ष रिंकू सिंगवर असणार आहे. रिंकूसाठी वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना महत्त्वाचा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com