Hitman unique swag saam tv
Sports

DC vs MI: दोघांचं भांडण रोहितची मजा...! बुमराह-नायरच्या वादात हिटमॅनचा वेगळाच स्वॅग, भांडणाची मजा घेतानाचा Video व्हायरल

Rohit Sharma: मुंबई विरूद्ध दिल्लीच्या सामन्यात जसप्रित बुमराह आणि करूण नायर यांच्यात काहीसा वाद झाला. दरम्यान या वादाची मजा रोहित घेत असल्याचं समोर आलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएलच्या २९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. या सामन्यात मुंबईने १२ रन्सने दिल्लीचा पराभव केला. या सामन्यात दिल्लीकडून करूण नायरने एन्ट्री घेतली. टीम इंडियाचा त्रिशतकवीर करुण नायरने या सामन्यात दिल्लीकडून खेळला. यावेळी त्याने आपल्या स्फोटक खेळीने मुंबईच्या गोलंदाजांना धुतलं. दरम्यान, त्याचा बुमराहशी शाब्दिक वाद देखील झाला. मात्र असं असताना रोहित शर्मा एका वेगळ्याच अंदाजात दिसून आला होता.

नायरची तुफान फलंदाजी

मुंबई इंडियन्स टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. वरच्या फळीतील शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्लीसमोर २०६ रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. यावेळी दिल्ली लक्ष्याचा पाठलाग करत असताना त्यांनी पहिल्याच चेंडूवर एक विकेट गमावली. पण त्यानंतर करुण नायर आला, ज्याने टीम इंडियाचा स्टार गोलंदाज बुमराहला धु-धु धुतलं. नायरने बुमराहच्या ९ बॉल्सचा सामना केला आणि २६ रन्स केले. यादरम्यान त्याने बुमराहला ३ चौकार आणि २ षटकार मारले.

बुमराह आणि करुण नायर यांच्यात जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळालं. ४८ रन्सवर खेळणाऱ्या नायरने बुमराहच्या गोलंदाजीवर एक शॉट मारला आणि दोन रन्स काढले. दरम्यान, बुमराह त्याच्याकडे आला आणि दोघांमध्ये वाद झाला. ब्रेक दरम्यान दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान यावेळी मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने येऊन नायरशी बोलून प्रकरण शांत केलं. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

रोहित शर्माने घेतली भांडणाची मजा

एककीडे टीमचा खेळाडू भांडण करत असताना रोहित शर्मा मात्र त्याच्याच मस्तीमध्ये दिसून आला. रोहित शर्मा नायर आणि बुमराह यांच्यातील वादविवादाचा आनंद घेत असल्याचं दिसून आलं. त्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झालीये. २०५ धावा केल्यानंतरही मुंबईच्या टीमला गोलंदाजीत संघर्ष करावा लागला. मात्र अखेरीस टीमने सामना जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT