Ind vs Sa saam tv
Sports

Ind vs Sa: रोहित आणि विराटने अर्धशतकानंतर केलं सारखंच सेलिब्रेशन; दोघांच्याही सेलिब्रेशनचा रोख नेमका कोणाकडे?

Rohit Sharma-Virat Kohli: भारतीय क्रिकेटमध्ये एक खास क्षण घडला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अर्धशतक पूर्ण केल्यानंतर अगदी सारख्याच पद्धतीने साजरा केला. हा योगायोग नसून यामागे एक खास कारण आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात टेस्ट सिरीजनंतर वनडे सिरीज खेळवण्यात येतेय. रांचीच्या मैदानावर पहिला वनडे सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात टीम इंडियाची पहिली फलंदाजी असून सामना पहायला आलेल्या प्रेक्षकांना RO-KO चा शो पाहायला मिळाला.

यशस्वी जयस्वालची विकेट गेल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी तुफान खेळी केली. दोन्ही खेळाडूंनी अर्धशतकं झळकावली असून दोन्ही खेळाडूंनी एका स्पेशल पद्धतीने सेलिब्रेशन केलं आहे. यावेळी दोघांचंही सेलिब्रेशन अगदी सेम असून याचा नेमका अर्थ काय आहे, असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जातोय.

कसं केलं दोघांनी सेलिब्रेशन?

पहिल्या वनडे सामन्यात पहिल्यांना विराट कोहलीने हाफ सेंच्युरी झळकावली. यावेळी त्याने प्रथम बॅट पकडून ती फिरवली आणि ती वर झळकावली. विराटच्या अर्धशतकानंतर रोहित शर्मानेही अर्धशतक झळकावलं. यावेळी रोहितनेही विराट सारखचं सेलिब्रेशन केलं. त्यामुळे या सेलिब्रेशनचा अर्थ नेमका काय असा प्रश्न समोर आहे.

रोहित शर्माने रचला इतिहास

रोहित शर्मा ५१ चेंडूत ५७ धावा काढून बाद झाला. १११.७६ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना रोहित शर्माने त्याच्या डावात पाच चौकार आणि तीन षटकार मारले. यासह रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. रोहित शर्माने वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड केला आहे.

या सामन्यात तीन षटकार मारून रोहित शर्माने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शाहिद आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडला आहे. रोहित शर्माने आता माजी पाकिस्तानी ऑलराऊंडर शाहिद आफ्रिदीला मागे टाकत वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा फलंदाज बनला आहे. रोहित शर्माने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३५२ षटकार मारले आहेत. शाहिद आफ्रिदीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही ३५१ षटकार मारले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT