riyan parag saam tv
Sports

Riyan Parag Viral Video: 'हॉट अनन्या पांडे.. अन् हॉट सारा..', युट्यूबवर हे काय सर्च करतोय रियान पराग? Video व्हायरल

Riyan Parag Youtube History: आयपीएल २०२४ स्पर्धेत रियान परागने शानदार कामगिरी केली. दरम्यान ही स्पर्धा झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत रियान परागच्या फलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने धावांचा पाऊस पाडला. राजस्थानने त्याला गेल्या काही वर्षांपासून सातत्याने संधी दिली. तेव्हा तो फ्लॉप ठरला. मात्र या हंगामात त्याची बॅट चांगलीच तळपली. मात्र आयपीएल संपताच तो वादात सापडला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात त्याची युट्यूब हिस्ट्री दिसून येत आहे.

रियान परागचा वादग्रस्त व्हिहिओ

राजस्थान रॉयल्सचा हा स्टार फलंदाज युट्यूब लाईव्ह स्ट्रिमिंग देखील करतो. त्यामुळे तो कॉपीराईट म्युझिक सर्च करण्यासाठी युट्यूबवर गेला. त्यावेळी त्याच्या सर्च हिस्ट्रीमध्ये ' अनन्या पांडे हॉट..' आणि 'सारा अली खान हॉट' असं सर्च केल्याचं दिसून आलं. एका युजरने हा व्हिडिओ शेअर करत रियान परागची युट्यूब हिस्ट्री असं लिहिलं आहे.

रियान पराग आणि वाद यांचं जुणं नातं आहे. यापूर्वी तो हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराजसारख्या अनुभवी खेळाडूंसोबत वाद घालताना दिसून आला होता. गेल्या वर्षी झालेल्या सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याने ७ अर्धशतकं झळकावली होती. त्यानंतर त्याने इशारा करत म्हटले होते की,मी वरच्या लेव्हलचा खेळाडू आहे. हा इशारा केल्यामुळे त्याला ट्रोल देखील केलं गेलं होतं.

आयपीएल २०२४ स्पर्धेत शानदार कामगिरी

आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी रियान परागच्या नावाचा देखील विचार केला गेला होता. त्याला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी दावेदार मानलं जात होतं. त्याच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १६ सामन्यांमध्ये ५७३ धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी होता. सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याने १० सामन्यांमध्ये ५१० धावा केल्या. यादरम्यान त्याने ७ अर्धशतक झळकावत ११ गडी देखील बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

SCROLL FOR NEXT