Rohit RR Patil : ...तर माझ्यावरही गुन्हे दाखल करा; सांगलीत रोहीत पाटील यांनी पोलीस ठाण्यात मांडला ठिय्या

Sangli Farmers Protest : पाण्यासाठी बिरणवाडी येथे पाण्यासाठी रास्ता रोको करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे रोहित आरआर पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे.
Rohit RR Patil
Rohit RR PatilSaam Digital
Published On

पाण्यासाठी बिरणवाडी येथे पाण्यासाठी रास्ता रोको करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे रोहित आरआर पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असतील तर माझ्यावर देखील गुन्हा दाखल करावा अन्यथा पोलीस ठाण्यातून हलणार नाही, अशी भूमिका रोहित पाटील यांनी घेतली आहे.

सावळजसह परिसरातील शेतकऱ्यांनी पुणदी सिंचन योजनेतून पाणी मिळावं, अशी मागणी आहे. ही मागणी अद्याप पूर्ण न झाल्यामुळे आज शेतकऱ्यांनी रास्तो रोको आंदोलन केलं होतं. या शेतकऱ्यांची धरपकड करून ताब्यात घेतलं असून गुन्हे दाखलं केलं आहेत. याला रोहीत पाटील यांनी विरोध दर्शवला आहे. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असतील तर माझ्यावर देखील गुन्हा दाखल करावा ही भूमिका रोहित पाटील यांनी घेतली असून पोलीस ठाण्यातचं ठाण मांडलं आहे.

विसापूर-पुनदी योजनेचे सिद्धेवाडी तलावात सोडलेले पाणी अचानक बंद करण्यात आलं आहे. त्यामुशे शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे सावळजच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्यावर रास्ता रोको केला त्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. संबंधित योजनेचे अधिकारी जोपर्यंत रास्ता रोकोच्या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता.

Rohit RR Patil
Beed News : वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी; वाऱ्याने प्रचंड नुकसान

पाण्याच्या बाबतीत राजकारण केलं जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पाण्याच्या बाबतीत केलं जाणारं राजकारण खपवून घेणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तसंच बंद केलेलं पाणी तातडीने सुरू करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Rohit RR Patil
Nanded Water Crisis : विहीर, पाझर तलाव आटले; नांदेड जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईच्या झळा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com