Rishabh Pant Health Update SAAM TV
Sports

Rishabh Pant comeback : रिषभ पंतची दणक्यात होणार एन्ट्री; संघात येताच कर्णधारपद; दिग्गज क्रिकेटपटूनं दिली अपडेट

Rishabh Pant Will Play IPL 2024 : रिषभ पंत लवकरच क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसणार आहे. सौरव गांगुलीनं पंतच्या 'वापसी'संदर्भात मोठी अपडेट दिली आहे.

Nandkumar Joshi

Saurav Ganguly on Rishabh Pant Health Update :

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक आणि विस्फोटक फलंदाज रिषभ पंत तंदुरुस्त होत असून, पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. लवकरच तो क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसणार आहे. माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीनं रिषभ पंतच्या 'वापसी'संदर्भात मोठी अपडेट दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रिषभ पंत गेल्या वर्षी कार अपघातात जखमी झाला होता. त्यामुळं तो बऱ्याच काळापासून टीम इंडियातून खेळलेला नाही. त्याने आयपीएल २०२३ मध्येही सहभाग घेतला नव्हता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही तो खेळला नाही. दुखापतीमुळं तो वर्ल्डकप २०२३ स्पर्धाही खेळू शकला नाही. मात्र, तो आता दुखापतीतून सावरला आहे. लवकरच तो मैदानात उतरेल, असे संकेत मिळतात. (Latest sports updates)

पंतने अलीकडेच कोलकातामध्ये आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये सहभाग घेतला होता. परंतु त्याने सराव केला नाही. त्याचदरम्यान माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने पंतबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

रिषभ पंत मागील वर्षी ३० डिसेंबरला दिल्लीहून कारने आपल्या घरी जात होता. त्यावेळी त्याचा अपघात झाला होता. दिल्ली-देहरादून हायवेवर त्याची कार उलटली होती. त्यात पंत जखमी झाला होता. पंतवर शस्त्रक्रिया झाली होती. आता तो दुखापतीतून सावरला आहे.

गांगुलीने पंतच्या फिटनेसबाबत महत्वाची माहिती दिली आहे. पंत हा पुढच्या आयपीएलमध्ये खेळणार आहे. दिल्ली कॅपिटल्समध्ये पंतचं पुनरागमन हे कर्णधार म्हणूनच होणार आहे. तो संघाच्या शिबिरात सहभागी झाला होता. पण त्याने सराव केला नाही. तो तिथे ११ नोव्हेंबरपर्यंत आहे. पंत हा संघाचा कर्णधार आहे आणि त्यामुळे त्याच्यासोबत संघाच्या बाबतीत चर्चा केली. आगामी लिलावासंदर्भात ही चर्चा झाली आहे, असेही गांगुलीने सांगितले.

जानेवारीत टीम इंडियात होणार वापसी?

पंतच्या पुनरागमनासंदर्भात काही दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार, तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होणार आहे. त्याचवेळी पुढील वर्षी जानेवारीत अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेद्वारे तो टीम इंडियात पुनरागमन करेल, अशी शक्यताही त्यात व्यक्त केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT