Rishabh Pant will miss the Border Gavaskar Trophy saam tv
Sports

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Rishabh Pant: पहिल्या टेस्ट सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर टीम इंडिया फलंदाजांनी गुडघे टेकले. या सामन्यात भारताचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत दुखापतग्रस्त झाला.

Surabhi Jayashree Jagdish

बंगळूरू टेस्टचा दुसरा दिवस टीम इंडियासाठी फारच वाईट गेला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर टीम इंडिया फलंदाजांनी गुडघे टेकले. या सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाने खेळ केल्याने दुसऱ्या दिवशी खेळाला सुरूवात झाली. या सामन्यात टीम इंडिया ४६ रन्सवर ऑलआऊट झाली तर यावेळी भारताला अजून एक मोठा धक्का बसला. या सामन्यात भारताचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत दुखापतग्रस्त झाला.

ऋषभ पंतला सामन्यादरम्यान दुखापत

न्यूझीलंड टीमचा पहिला डाव सुरू असताना रविंद्र जडेजाने टाकलेला बॉलवर डेवॉन कॉन्वे शॉट खेळायला चुकला. यामुळे बॉल काहीसा मागे गेला. परंतु पंतही तो बॉल झेलू शकला नाही आणि तो बॉल त्याच्या गुडघ्यावर जाऊन जोरात लागला. यामुळे पंतला चांगल्याच वेदना झाल्या. त्यानंतर तो फिजिओबरोबर मैदानातून बाहेर गेला. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस ध्रुव जुरेलने विकेटकीपिंग केलं.

आज सामन्याचा तिसरा दिवस असून पंत मैदानावर उतरलेला नाही. पंत आता तिसऱ्या दिवशीही विकेकीपिंगसाठी उतरणार नसल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलंय. त्यामुळे त्याच्या जागेवर जुरेलच विकेटकीपिंग करतोय. तसंच बीसीसीआयच्या सांगण्यानुसार, त्याच्यावर मेडिकल टीम उपचार करत असून टीम इंडियासाठी ही एक मोठी चिंता ठरू शकते.

रोहित शर्माने दिली माहिती

दरम्यान पंतची दुखापत किती गंभीर आहे, यावर तो न्यूझीलंडविरुद्धच्या पुढच्या सामन्यांमध्ये खेळणार की नाही हे समजणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ऋषभ पंतच्या दुखापतीबाबत अपडेट्स दिलेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहितने सांगितलं की, ऋषभ पंतच्या गुडघ्याला सूज आली असून ही दुखापत त्याच गुडघ्याला आहे ज्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती. आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही. या सामन्यात तो कमबॅक करू शकेल, अशी आशा आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत?

न्यूझीलंडविरूद्धची सिरीज संपल्यानंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जायचं आहे. यावेळी ५ सामन्यांची बॉर्डक-गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजसाठी पंत भारताचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मात्र यावेळी पंतची दुखापत गंभीर असेल, तर त्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील उपलब्धतेतबाबत प्रश्नचिन्ह असणार आहे. त्यामुळे आता पंत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार का ही चिंता देखील टीम इंडियाला सतावेतय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT