rishabh pant yandex
Sports

Duleep Trophy 2024: रिषभ पंतचं स्थान धोक्यात! स्टार खेळाडू करतोय कमबॅक

Ishan Kishan: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. दरम्यान ही मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय खेळाडू दुलीप ट्रॉफी खेळताना दिसून येणार आहेत.

Ankush Dhavre

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मालिकेनंतर भारतीय संघातील खेळाडू सध्या विश्रांतीवर आहे. बांगलादेशविरुद्ध होणारी कसोटी मालिका हे भारतीय संघासमोर असलेलं पुढील आव्हान असणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याच्या दृष्टीने भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. भारतीय संघ (Team India) २ कसोटी सामना आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हेड कोच गौतम गंभीरची वनडे, टी-२० नंतर पहिलीच कसोटी मालिका असणार आहे.

स्टार खेळाडू दुलीप ट्रॉफी खेळणार?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी दुलीप ट्रॉफी (Duleep Trophy) स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा ५ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. दरम्यान या स्पर्धेत रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडू खेळताना दिसून येऊ शकतात. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते.

इशान किशनचं होणार कमबॅक

भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) हा गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. संघाबाहेर झाल्यानंतर त्याला रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र त्याने या स्पर्धेला पाठ फिरवत आयपीएल स्पर्धेचा सराव सुरु केला होता. त्यामुळे त्याला सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान त्याला कमबॅक करायचं असेल, तर त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळावं लागणार आहे.

सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमधून सुट्टी

इशान किशन आणि श्रेयस अय्यरला बीसीसीआयने सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमधून काढून टाकण्यात आलं होतं. दोघांनाही आपल्या संघाकडून रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र दोघांनी बीसीसीआयचं ऐकलं नव्हतं. त्यामुळे बीसीसीआयने टोकाची भूमिका घेत दोघांनाही सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर इशान किशन मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना दिसून आला होता. तर श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरु्द्धच्या वनडे मालिकेतून कमबॅक केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या मित्रपक्षात मोठी फूट; ३६ आमदारांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पुकारले बंड, राजकारणात खळबळ

Shocking: बायकोचे अनेकांसोबत प्रेमसंबंध, घरी यायचे बॉयफ्रेंड; प्रायव्हेट व्हिडीओ पाहून नवऱ्याची आत्महत्या

Kavala Kiti Varsh Jagto: कावळ्याचं आयुष्य किती असतं? किती वर्ष जगतो? माहितीये का

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल 415 रुपयांपार, पाकिस्तानी जनतेची झोप उडाली

Petrol Pump Free Facilities: पेट्रोल पंपावर मोफत मिळतात या ५ गोष्टी, तुम्हाला माहितीये का?

SCROLL FOR NEXT