Rishabh Pant out saam tv
Sports

IND VS ENG: पाचव्या टेस्ट सामन्यातून ऋषभ पंत बाहेर; 'या' नवख्या खेळाडूला टीम इंडियात संधी, BCCI ने केलं कन्फर्म

Rishabh Pant out 5th Test: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आगामी पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मँचेस्टरमध्ये पार पडलेल्या चौथ्या टेस्टनंतर टीम इंडियासमोर एक मोठी चिंता उभी राहिलीये. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि निर्णायक टेस्ट सामन्यापूर्वी भारताचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे सिरीजबाहेर गेला आहे. पंतला चौथ्या टेस्ट दरम्यान उजव्या पायाला दुखापत झाली होती.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने रविवारी उशिरा याची अधिकृत घोषणा केली. दरम्यान आता पंतच्या जागी तामिळनाडूचा विकेटकीपर फलंदाज नारायण जगदीशनला टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे.

घरच्या क्रिकेटमधील कसा आहे जगदीशनचा फॉर्म

नारायण जगदीशन हा तामिळनाडू टीमतील अतिशय विश्वासू आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू आहे. त्याने सलग दोन रणजी सिझनमध्ये सर्वाधिक रन्स काढणाऱ्यांच्या यादीत वरचं स्थान गाठलं. रणजी ट्रॉफी 2023-24 मध्ये त्याने 13 डावांमध्ये 74.18 च्या सरासरीने 816 रन्स केल्या. तर 2024-25 मध्ये 13 डावांमध्ये 56.16 च्या सरासरीने 674 रन्स केलेत. यात 2 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

जगदीशनने 2016 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आतापर्यंत 79 डावांमध्ये त्याने 10 शतकं आणि 14 अर्धशतकांच्या मदतीने 3373 रन्स केले आहेत. त्याचा सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर 321 रन्सचा आहे.

BCCI कडून मिळालेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय जगदीशनला रविवारी सकाळी व्हिसा मिळाला असून तो मंगळवारपर्यंत लंडनला टीममध्ये सामील होणार आहे. तो विकेटकीपर ध्रुव जुरेलचा बॅकअप म्हणून टीममध्ये असेल. पाचव्या टेस्टमध्ये मुख्य विकेटकीपिंगची जबाबदारी जुरेलवरच असणार आहे.

गौतम गंभीरकडून पंतचं कौतुक

टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीरने ऋषभ पंतचं कौतुक केलं आहे. तो म्हणाला की, पंत पायाच्या बोटाला फ्रॅक्चर असूनही तो मैदानात फलंदाजीसाठी उतरला. पंत सिरीजबाहेर गेला आहे, पण त्याने दुखापतीनंतर दाखवलेली जिद्द कौतुकास्पद आहे. पायाच्या बोटाला फ्रॅक्चर असून देखील तो फलंदाजीला उतरला. अशी कामगिरी फार कमी लोकांनी केलीये. त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.

भविष्यातही त्याच्या या कौतुकाबद्दल बोललं जाईल. त्याचा फॉर्म पाहता त्याची अनुपस्थिती खूप मोठा फटका असणार आहे. पण मला खात्री आहे तो लवकरच कमबॅक करेल. तो टेस्ट टीमचा एक महत्त्वाचा सदस्य, असल्याचंही गंभीर म्हणालाय

पाचव्या टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अंशुल कंबोज, अर्शदीप सिंह, एन. जगदीशन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT