Rishabh Pant  saam tv
Sports

Rishabh Pant : आयपीएल विश्वात खळबळ!ऋषभ पंतनं अचानक घेतला मोठा निर्णय, LSG चे कर्णधारपद सोडलं

rishabh pant resigns as lsg captain : यंदाच्या आयपीएल हंगामात लखनऊ सुपर जायंट्सच्या निराशाजनक कामगिरीनंतर ऋषभ पंतने कर्णधारपद सोडलं. फ्रेंचाइजीनं याबाबत ट्विट करून माहिती दिली.

Nandkumar Joshi

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील प्रवास प्लेऑफ शर्यतीआधीच थांबल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने मोठा निर्णय घेतला आहे. २७ कोटी रुपये मोजून खरेदी केलेल्या पंतने लखनऊ संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पंतच्या या निर्णयामुळं आयपीएल विश्वात खळबळ उडाली आहे.

लखनऊ सुपर जायंट्स यंदाच्या आयपीएल २०२६ मधून बाहेर झाली आहे. पुढील आयपीएल हंगामापासून ऋषभ पंत हा कर्णधार नसेल. लखनऊ सुपर जायंट्स फ्रेंचाइजीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली. पंत यानं स्वतःहून कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची विनंती केली होती. ती विनंती आम्ही स्वीकारत आहोत, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

ऋषभ पंत याने लखनऊ सुपर जायंट्सचं कर्णधारपद सोडत असल्याची विनंती केली. फ्रेंचाइजीने त्याची विनंती स्वीकारली आहे. याबाबत आम्ही औपचारिक घोषणा करत आहोत, असे संघ व्यवस्थापनाने म्हटले आहे. याबाबत पंत याने फ्रेचाइजीशी संपर्क साधला होता. त्याचा सन्मान ठेवून आम्ही त्याची विनंती स्वीकारली आहे. असे निर्णय कधीच सोपे नसतात. कर्णधार म्हणून पंत याने दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत. आता आमचं संपूर्ण लक्ष हे संघाच्या सामूहिक विकासावर आहे. सर्वश्रेष्ठ स्थानी पोहोचण्यासाठी संघाची पुन्हा उभारणी करणे आणि पुनर्गठन करण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे टॉम मूडी यांनी म्हटले आहे.

आयपीएल २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सची कामगिरी निराशाजनक होती. १४ सामन्यांपैकी केवळ चार सामन्यांत विजय मिळवला. ८ गुणांसह संघ गुणतालिकेत १० व्या क्रमांकावर राहिला. ऋषभ पंत कर्णधार म्हणून अपयशी ठरला. त्याला २०२५ मध्ये झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये लखनऊ सुपर जायंट्सने २७ कोटी रुपयांना खरेदी करून आपल्या संघात घेतले होते. त्याच्याकडून प्रचंड आशा होत्या. पण आयपीएल २०२५ मध्ये पंत आणि संघाची कामगिरीही चांगली होऊ शकली नव्हती. आयपीएल २०२६ मध्येही पंत आणि संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

Avoiding Chips and Cold Drink: चिप्स खाणं आणि कोल्ड ड्रिंक्स पीणं २१ दिवस बंद केल्यावर शरिरावर काय परिणाम होतो?

Maharashtra News Live Update: भिवंडीत टेमघर येथे भंगार साठवलेल्या गोदामाला भीषण आग

Manoj Jarange: मोठी बातमी! २ तासांच्या चर्चेनंतरही तोडगा नाही, मनोज जरांगे उपोषणावर ठाम

Health Care: स्ट्रॉन्ग हेल्थसाठी आलिया भट्टचा हा सुपरफूड नक्की खा; वाढेल दुप्पट एनर्जी

SCROLL FOR NEXT