Retirement has become a joke-Rohit Sharma saam tv
क्रीडा

Rohit Sharma : निवृत्ती घेणं ही थट्टा झालीये...; रिटायरमेंट यूटर्नच्या प्रश्नावर संतापला रोहित शर्मा

Rohit Sharma: टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-२० फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. अशातच रोहित शर्मा निवृत्ती मागे घेणार का, असा सवाल अजूनही क्रिकेट प्रेमींच्या मनात आहे. मात्र यावर रोहितने स्पष्ट उत्तर दिलं आहे.

Surabhi Jagdish

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकप २०२४ वर भारताचं नाव कोरलं. टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर तातडीने विराट कोहली आणि रोहित शर्माने या छोट्या फॉर्मेटमधून निवृत्ती घेत असल्याचं स्पष्ट केलं. या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंच्या या तडकाफडकी निर्णयाने सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला. अशातच रोहित शर्मा निवृत्ती मागे घेणार का, असा सवाल अजूनही क्रिकेट प्रेमींच्या मनात आहे. तर आता रोहितने या प्रश्नाचं उत्तर दिलंय.

टी-२० वर्ल्डकप जिंकून रोहित शर्माचं जणू एक स्वप्न पूर्ण झालं. याबाबत त्याने स्वतःही कबुली दिली होती. त्यामुळे हे मोठं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर रोहित शर्माने या फॉर्मेटमधून निवृ्त्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता रोहित शर्मा त्याच्या निवृत्तीच्या निर्णयावरून यु-टर्न घेणार का, यावर हिटमॅनने मौन सोडलं आहे.

निवृत्तीबाबत काय म्हणाला रोहित शर्मा?

जिओ सिनेमाशी बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, सध्या निवृ्त्ती घेणं हा सर्वांसाठी एक थट्टा झाली आहे. यामध्ये खेळाडू त्यांच्या निवृत्तीची घोषणा करतात पण त्यानंतर ते माघार घेऊन पुन्हा खेळात परततात. भारतात असं घडलेलं नाही. याठिकाणी हे फार दुर्मिळपणे पाहायला मिळतं.

रोहित पुढे म्हणाला, मी इतर देशांतील खेळाडूंचं निरीक्षण केलंय. ते निवृत्तीची घोषणा करतात परंतु नंतर याबाबत यू-टर्न घेतात. त्यामुळे कोणी खरोखर निवृत्त झालं आहे की नाही हे तुम्हाला कधीच कळत नाही.”

रोहित शर्मा त्याच्या निवृत्तीचा पुन्हा करणार विचार?

यावेळी रोहित शर्माला तो त्याच्या निवृत्तीचा पुन्हा विचार करणार का असा सवाल करण्यात आला. यावेळी त्याने नकारार्थी उत्तर दिलं. रोहित शर्माच्या सांगण्यांनुसार, माझा निर्णय हा अंतिम आणि स्पष्ट आहे. टी-२० फॉर्मेटला अलविदा म्हणण्याची ती योग्य वेळ होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT