srh twitter
Sports

Sunrisers Hyderabad: हैदराबादचं नेमकं चुकतंय तरी कुठं? सलग २ सामने गमावण्याची ही आहेत प्रमुख कारणं

Reason Behind Sunrisers Hyderabad: सनरायझर्स हैदराबाद संघाने सलग २ सामने गमावले आहेत. दरम्यान हे सामने गमावण्याची नेमकं कारणं काय? जाणून घ्या.

Ankush Dhavre

सनरायझर्स हैदराबाद संघ गेल्या हंगामातील गतविजेता संघ आहे. विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हैदराबादने पहिल्याच सामन्यात राजस्थानवर हल्लाबोल करत दमदार विजय मिळवला.

या विजयानंतर हैदराबादने इतर संघांना चेतावणी दिली होती. मात्र पुढील २ सामन्यात हैदराबादचे फलंदाज फुसका बार निघाले आहेत. ३०० पारची स्वप्नं पाहणाऱ्या हैदराबादला पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबादचं नेमकं चुकतंय तरी कुठं? काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

सनरायझर्स हैदराबाद संघात एकापेक्षा एक विस्फोटक फलंदाज आहेत. काही वर्षांपू्र्वी हा संघ आपल्या गोलंदाजीसाठी ओळखला जायचा. मात्र गेल्या २ वर्षात या संघाने तगड्या फलंदाजांना संघात स्थान दिलं. गेल्या हंगामात तर या संघातील फलंदाजांनी कहर केला होता. क्वचितच सामने असतील, ज्या सामन्यात या संघाने २०० धावांचा पल्ला गाठला नसेल.

याच संघाने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यात या संघाला आपलाच रेकॉर्ड मोडायची संधी होती. मात्र हा संघ १ धाव दूर राहिला. हैदराबादने २८६ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर, या संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. हाच संघ ३०० धावांचा पल्ला गाठू शकतो. मात्र हैदराबादचे फलंदाज या अपेक्षेवर खरे उतरु शकलेले नाहीत.

हैदराबादचं नेमकं चुकतंय तरी कुठं?

इशान किशनने पहिल्याच सामन्यात केलेल्या शतकी खेळीनंतर सांगितलं होतं की,आमच्या कर्णधाराने आम्हाला फ्री हँड दिला आहे. त्यामुळे हैदराबादचे फलंदाज एकेरी दुहेरी धावा घेण्यावर जास्त भर देत नाहीत.

हे फलंदाज पहिल्या चेंडूपासूनच हल्ला चढवतात. या नादात विकेट्स जातात. त्यामुळे कुठेही फलंदाजीत सातत्य दिसून येत नाही. दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही एकट्या अनिकेतला सोडलं, तर उर्वरीत कुठल्याही फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.

गोलंदाजांची फ्लॉप कामगिरी

फलंदाजांना सोडलं, तर गोलंदाजांनाही हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी २८६ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र गोलंदाजांनी २४२ धावा खर्च केल्या होत्या. हा सामना हैदराबादने ४४ध धावांनी आपल्या नावावर केला होता. त्यानंतर पुढील सामन्यात हैदराबादने १९० धावा केल्या. मात्र या धावा करताना लखनऊने २३ चेंडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकला. म्हणजे इथेही हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई झाली. आता सलग तिसऱ्या सामन्यात हैदराबादचे गोलंदाज फ्लॉप ठरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dadar Kabutarkhana : ‘आम्हीही मुंबईकर असून...’, कबुतरखान्याच्या बंदीदरम्यान 'पेटा'ची जाहिरात चर्चेत

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे देवगोई घाटात कोसडली दरड

Sai Tamhankar : ब्लॅक ब्लेझर अन् स्टायलिश लूक; सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अंदाज, पाहा PHOTOS

Sleep Job Offer: '9 तास झोपा अन् 10 लाख कमवा'; प्रसिद्ध कंपनीची भन्नाट ऑफर

Mahindra BE 6 Batman Edition: महिंद्राची नवी बॅटमन एडिशन कार लाँच! पहिल्याच दिवसापासून बुकिंगला मोठी मागणी, धमाकेदार फिचर्स

SCROLL FOR NEXT