reason behind team india defeat  saam tv
क्रीडा

IND vs WI 2nd T20: ..तर पराभव टळू शकला असता, हार्दिक पंड्याची ही एक चूक टीम इंडियाला पडली महागात

Ankush Dhavre

Defeat Behind Team India's Defeat: भारतीय संघाला सलग दुसऱ्या टी -२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १५२ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडीजने २ गडी आणि ७ चेंडू राखून विजय मिळवला.

पिछाडीवर असलेल्या युजवेंद्र चहलने एकाच षटकात भारतीय संघाला कमबॅक करून दिले होते. मात्र त्याचे षटक शिल्लक ठेऊन हार्दिक पंड्याने मोठी चूक केली. परिणामी भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला.

या सामन्यात एक वेळ अशी होती जेव्हा निकोलस पुरन भारतीय संघाचा चांगलाच समाचार घेत होता. तो आक्रमक फलंदाजी करत वेस्टइंडीज संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात होता. मात्र १४ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मुकेश कुमारने त्याला बाद केलं आणि पॅव्हेलियनची वाट दाखवली.

इथुन वेस्टइंडीज संघाला विजयासाठी ६ षटकात अवघ्या २७ धावांची गरज होती. रवि बिश्नोईने १६ व्या षटकात केवळ १ धावांचे षटक टाकले. त्यानंतर पुढच्याच षटकात चहलने हेटमायनरला बाद केलं. ४ षटकांचा खेळ शिल्लक होता.

या ४ पैकी १ षटक चहलचे होते. असं वाटत होतं की, हा सामना भारतीय संघ जिकंणार. मात्र हार्दिक पंड्याचा निर्णय चुकला.

युजवेंद्र चहलने ३ षटकात दमदार गोलंदाजी केली होती. त्याच्या गोलंदाजीचा रिदम पाहता त्याला चौथे षटक त्याला मिळायला हवे होते. मात्र पुढील ३ षटकात हार्दिक पंड्याने वेगवान गोलंदाजांचा वापर केलाय ज्याचा यजमानांनी चांगलाच फायदा घेतला.

वेस्टइंडीजने पुढील १७ चेंडुंमध्ये २४ धावा ठोकत भारतीय संघाचा पराभव केला. युजवेंद्र चहलला या सामन्यात आपले ४ षटक पूर्ण करता आले नाही. (Latest sports updates)

भारतीय संघाचा पराभव...

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १५२ धावांचा डोंगर उभारला होता. या डावात तिलक वर्माने भारतीय संघाकडून सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली.

तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मात्र निकोलस पुरनच्या आक्रमक खेळीच्या जोरावर वेस्टइंडीज संघाला २ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT