cheteshwar pujara saam tv
Sports

Cheteshwar Pujara: तर 'या' कारणामुळे चेतेश्वर पुजाराला केलं गेलं संघाबाहेर; खरं कारण आलं समोर

Cheteshwar Pujara- Umesh Yadav: अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादवला बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे.

Ankush Dhavre

IND VS WI: भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता भारतीय संघ २ कसोटी, ३ वनडे आणि ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे.

या दौऱ्यावर होणाऱ्या वनडे आणि कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तर टी -२० मालिकेसाठी संघाची घोषणा व्हायची आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कसोटी संघ पाहिला, तर या संघात मोठे बदल केल्याचे पाहायला मिळाले आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूंना संघाबाहेर करून युवा खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं आहे. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादवला बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे. तर मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे.

चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि उमेश यादवला (Umesh Yadav) बाहेर करताच असा दावा केला जात आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे त्यांना बाहेर केलं गेलं आहे. मात्र टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तात म्हटलं गेलं आहे की, चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादवसाठी अजूनही भारतीय संघाचे दार खुले आहेत. त्यामुळे हे दोघे केव्हाही पुनरागमन करू शकतात. (Latest sports updates)

बीसीसीआयच्या एका सुत्राने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत असे सांगितले की, 'उमेश हॅमस्ट्रिंगच्या समस्येने त्रस्त आहे. त्यामुळे तो नॅशनल क्रिकेटमध्ये असुन तो दुखापतीतुन सावरण्याच्या प्रयत्नात आहे.' सुत्राच्या माहितीनुसार उमेश यादव कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक करू शकतो. यापुर्वी अजिंक्य रहाणेला देखील संघाबाहेर केलं गेलं होतं. मात्र त्याने आता संघात कमबॅक केलं असुन त्याला संघाचे उपकर्णधारपद दिले गेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकार नेहमी राजकीय खेळ करते - प्रियंका गांधी

आम्ही चर्चेसाठी तयार...; विरोधक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम, लोकसभेत मोठा गोंधळ|VIDEO

Breathing Problems : नाक बंद झालय? श्वास घ्यायला त्रास होतोय? तर घरच्या घरी करा 'हे' सोपे उपाय

Auto Tips : बाईक कमी मायलेज देतेय? 'हे' ५ बदल केल्याने होईल पेट्रोलची बचत

Blood Pressure : बीट की डाळिंब? BP नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता ज्यूस फायदेशीर

SCROLL FOR NEXT