Sports

WPL 2024 RCB vs UPW : RCBचा पहिला विजय; यूपी वॉरियर्सचा २ धावांनी पराभव, शोभनाचा विजयी 'पंजा'

RCB vs UPW : महिला प्रीमियर लीग २०२४ च्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूने युपी वॉरियर्सचा २ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बेंगळुरूच्या संघाने ६ विकेट गमावत २० षटकात १५७ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना युपीच्या संघ फक्त १५५ धावा करू शकला.

Bharat Jadhav

WPL 2024 RCB vs UPW RCB won 1st Match:

महिला प्रीमियर लीग 2024 (WPL 2024) च्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने यूपी वॉरियर्सचा २ धावांनी पराभव केला. मागील आयपीएलच्या सत्रात पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना बेंगळुरूला करावा लागला होता. शोभनाच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर बेंगळुरूच्या संघाने मागील वर्षाचा वचपा काढला. शोभनाने ५ विकेट घेत युपीच्या संघाला पराभूत केलं. (Latest News)

लक्ष्याचा पाठलाग करताना यूपीची सुरुवात खराब झाली. युपीची हुकमीची फलंदाज एलिस हीली दुसऱ्याच षटकात बाद झाल्यानंतर युपीच्या संघ दबावात आला. याचा फायदा घेत शोभनाने एका षटकात दोन गडी बाद करत यूपीचा डाव उद्ध्वस्त केला. शोभनाने एकाच षटकात तीन विकेट युपीची संघाचं कंबरडं मोडलं. यूपीकडून ग्रेस हॅरिसने सर्वाधिक ३८ धावा केल्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांत ६ गडी गमावून १५७ धावा केल्या. यूपीला विजयासाठी १५८ धावा करायच्या होत्या. बेंगळुरुच्या संघाकडून फलंदाजी करताना ऋचा घोषने शानदार फलंदाजी करत ३७चेंडूत ६२ धावांची तुफानी खेळी केली. मेघनाने ५३ धावांचे योगदान दिले. उत्तर प्रदेशच्या संघाकडून राजेश्वरी गायकवाडने सर्वाधिक 2 बळी घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT