rcb vs rr saam tv
Sports

RCB VS RR Live Score: फाफ-मॅक्सवेलची तुफानी अर्धशतकं! विजय मिळवण्यासाठी राजस्थानला १९० धावांचे आव्हान

RCB VS RR 1st Inning: बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरु आहे

Ankush Dhavre

IPL 2023 LIVE UPDATES: बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरु आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून पप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अप्रतिम फलंदाजी केली आणि २० षटकअखेर ९ गडी बाद १८९ धावा केल्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघाला १९० धावांची गरज आहे.

फाफ - मॅक्सवेलची अप्रतिम फलंदाजी...

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला होता. राजस्थान रॉयल्स संघाने सुरुवातीलाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा धक्का दिला. विराट कोहली खाते ही न उघडता माघारी परतला.

ट्रेंट बोल्टने त्याला पायचीत करत माघारी धाडले. तर फाफ डू प्लेसिसने मैदानाच्या चारही बाजूंना फटकेबाजी करत ८ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ६२ धावांची खेळी केली. तर ग्लेन मॅक्सवेलने ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७७ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटक अखेर १८९ धावा केल्या आहेत. (Latest sports updates)

या सामन्यात अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :

विराट कोहली (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज, विजयकुमार विशक

राजस्थान रॉयल्स:

जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How to Reduce Cholesterol: फक्त 7 दिवसांत कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? मग आहारात लगेच करा हे 4 बदल

मनसेच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: राज ठाकरे 28 आणि 29 या दोन दिवसाच्या कल्याण- डोंबिवली दौऱ्यावर

Famous Actor Death : चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुर्दैवी घटना! प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Shengdana Chutney Recipe : हिवाळ्यात गरमागरम भाकरीसोबत हवीच शेंगदाण्याची चमचमीत चटणी, वाचा अस्सल पारंपरिक रेसिपी

SCROLL FOR NEXT