Ankush Dhavre
आज जगभरात ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
ईद हा मुस्लिम समुदायातील लोकांसाठी सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे.
सध्या भारतात आयपीएल स्पर्धेचा थरार सुरू आहे.
या सणाच्या दिवशी खेळाडूंनी ईद साजरा केल्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
भारतीय संघातील खेळाडू मोहम्मद सिराजने आपल्या कुटुंबासह ईद साजरी केली आहे.
मोहम्मद शमीने देखील ईद साजरा केल्याचा फोटो शेअर केला आहे.
सिकंदर रझाने देखील ईद साजरी केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
यूसुफ पठाण आणि इरफान पठाणने देखील ईद साजरी करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
उमरान मलिकने देखील हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.